नागपुरात रोजगाराचे आमिष दाखवून रक्कम हडपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 07:49 PM2020-05-23T19:49:04+5:302020-05-23T19:51:47+5:30

रोजगाराच्या शोधात असलेल्या एका तरुणाला रोजगाराचे आमिष दाखवून एका महिलेने त्याच्याकडून २० हजार रुपये लंपास केले. २४ डिसेंबर २०१९ ते ४ मार्च २०२० या दरम्यान ही घटना घडली.

In Nagpur, the money was snatched by showing the lure of employment | नागपुरात रोजगाराचे आमिष दाखवून रक्कम हडपली

नागपुरात रोजगाराचे आमिष दाखवून रक्कम हडपली

googlenewsNext
ठळक मुद्देतरुणाची फसवणूक : आरोपी महिलेवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रोजगाराच्या शोधात असलेल्या एका तरुणाला रोजगाराचे आमिष दाखवून एका महिलेने त्याच्याकडून २० हजार रुपये लंपास केले. २४ डिसेंबर २०१९ ते ४ मार्च २०२० या दरम्यान ही घटना घडली. अरविंदकुमार व्यास शर्मा ( वय २२) असे पीडित तरुणाचे नाव असून तो एमआयडीसीतील प्रियदर्शिनी होस्टेल नंबर ४ मध्ये राहतो. शर्मा रोजगाराच्या शोधात ऑनलाईन सर्चिंग करत असताना त्याच्या मोबाईलवर २४ डिसेंबर २०१९ ला फोन आला. पलीकडून बोलणाऱ्या महिलेने आपले नाव अदिती अशोक प्रतापसिंग शर्मा सांगितले. तुम्ही, आम्ही सांगितलेले फॉर्म भरून द्या. पंधरा दिवसात १ हजार फॉर्म भरून दिले तर प्रत्येकी १२ रुपये ५० पैसे एका फॉर्मप्रमाणे तुम्हाला १२ हजार ५०० रुपये मानधन मिळेल, असे त्या महिलेने सांगितले होते. तिने सांगितल्याप्रमाणे शर्माने १५ दिवसात ४४८ फॉर्म भरले. त्याचे मानधन मिळावे म्हणून तो अदिती हिच्यासोबत फोनवरून संपर्कात होता. आधी तिने त्याला एनओसी चार्जेस, जीएसटी चार्जेस, फाईल अपडेट चार्जेसच्या नावाखाली एकूण १९ हजार ९८० रुपये मोबाईल फोन पे अ‍ॅप द्वारे जमा करण्यास सांगितले. ती रक्कम लंपास करून स्वत:चा फोन बंद केला. तिने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे शर्माने एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. हे प्रकरण तपासासाठी सायबर सेलकडे गेले. त्यानंतर शुक्रवारी या प्रकरणात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. कथित अदिती शर्माचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: In Nagpur, the money was snatched by showing the lure of employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.