Nagpur Mayor is elected on 22 th November | नागपूरच्या महापौरांची निवड २२ नोव्हेंबरला
नागपूरच्या महापौरांची निवड २२ नोव्हेंबरला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापौर नंदा जिचकार यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ व वाढीव कार्यकाळही संपला आहे. बुधवारी महापौर आरक्षणाची सोडतही निघाली. येत्या २२ नोव्हेंबर रोजी नवीन महापौरांची निवड सकाळी ११ वाजता महाल येथील टाऊन हॉलमध्ये होईल. महापौर निवडणुकीसाठी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते ३ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. नवीन महापौर हा ५३ वा राहिल. महापालिकेत १५१ जागेपैकी १४९ नगरसेवक आहे. दोन जागा रिक्त आहे. तरीही भाजपाजवळ १०६ नगरसेवक आहे. काँग्रेसजवळ २९, बसपा १०, शिवसेना २, राष्ट्रवादी १ व १ अपक्ष नगरसेवक आहे. त्यामुळे महापौराची निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित आहे.

Web Title: Nagpur Mayor is elected on 22 th November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.