नागपूर हायकोर्टाच्या कामकाजाचे जुलैतील नियोजन जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 08:26 PM2020-07-01T20:26:19+5:302020-07-01T20:27:26+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील कामकाजाचे जुलैतील नियोजन जाहीर करण्यात आले आहे.

Nagpur High Court's July schedule announced | नागपूर हायकोर्टाच्या कामकाजाचे जुलैतील नियोजन जाहीर

नागपूर हायकोर्टाच्या कामकाजाचे जुलैतील नियोजन जाहीर

googlenewsNext

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील कामकाजाचे जुलैतील नियोजन जाहीर करण्यात आले आहे.
नवीन नियोजनानुसार २ जुलै रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत न्या. मुरलीधर गिरटकर अटकपूर्व जामीन अर्ज, न्या. अविनाश घरोटे नियमित जामीन अर्ज, ३ जुलै रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत न्या. रवी देशपांडे व न्या. अमित बोरकर यांचे द्विसदस्यीय न्यायपीठ आणि न्या. मनीष पितळे यांचे एकल न्यायपीठ आपापल्या अधिकारातील तातडीची व अ‍ॅडमिशन श्रेणीतील दिवाणी प्रकरणे तर, दुपारी २ ते ३.३० व ३.४५ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत न्या. अतुल चांदुरकर व न्या. अनिल किलोर यांचे द्विसदस्यीय न्यायपीठ आणि न्या. स्वप्ना जोशी यांचे एकल न्यायपीठ आपापल्या अधिकारातील तातडीची व अ‍ॅडमिशन श्रेणीतील फौजदारी प्रकरणे ऐकतील.
येथून पुढे सकाळी १०.३० ते दुपारी १.३० आणि दुपारी २.३० ते ४.३० वाजेपर्यंत कामकाज होईल. या वेळेत ६ जुलै व ९ जुलै रोजी न्या. सुनील शुक्रे व न्या. श्रीराम मोडक यांचे द्विसदस्यीय न्यायपीठ आणि न्या. रोहित देव यांचे एकल न्यायपीठ आपापल्या श्रेणीतील तातडीची व अ‍ॅडमिशन श्रेणीतील दिवाणी प्रकरणे, न्या. नितीन सांबरे तातडीचे नियमित जामीन अर्ज, ७ जुलै व १० जुलै रोजी न्या. झेड. ए. हक व न्या. नितीन सूर्यवंशी यांचे द्विसदस्यीय न्यायपीठ आणि न्या. विनय जोशी यांचे एकल न्यायपीठ आपापल्या अधिकारातील तातडीची व अ‍ॅडमिशन श्रेणीतील फौजदारी प्रकरणे, न्या. पुष्पा गणेडीवाला तातडीचे अटकपूर्व जामीन अर्ज, १३ जुलै व १६ जुलै रोजी न्या. रवी देशपांडे व न्या. अनिल किलोर यांचे द्विसदस्यीय न्यायपीठ आणि न्या. मनीष पितळे यांचे एकल न्यायपीठ तातडीची व अ‍ॅडमिशन श्रेणीतील दिवाणी प्रकरणे, न्या. अविनाश घरोटे तातडीचे नियमित जामीन अर्ज, १४ व १७ जुलै रोजी न्या. अतुल चांदुरकर व न्या. अमित बोरकर यांचे द्विसदस्यीय न्यायपीठ आणि न्या. स्वप्ना जोशी यांचे एकल न्यायपीठ तातडीची व अ‍ॅडमिशन श्रेणीतील फौजदारी प्रकरणे, न्या. मुरलीधर गिरटकर तातडीचे अटकपूर्व जामीन अर्ज, २० जुलै व २३ जुलै रोजी न्या. सुनील शुक्रे व न्या. नितीन सूर्यवंशी यांचे द्विसदस्यीय न्यायपीठ आणि न्या. रोहित देव यांचे एकल न्यायपीठ तातडीचे व अ‍ॅडमिशन श्रेणीतील दिवाणी प्रकरणे, न्या. विनय जोशी तातडीचे नियमित जामीन अर्ज, २१ जुलै व २४ जुलै रोजी न्या. झेड. ए. हक व न्या. श्रीराम मोडक यांचे द्विसदस्यीय न्यायपीठ आणि न्या. नितीन सांबरे यांचे एकल न्यायपीठ तातडीची व अ‍ॅडमिशन श्रेणीतील फौजदारी प्रकरणे तर, न्या. पुष्पा गणेडीवाला तातडीचे अटकपूर्व जामीन अर्ज ऐकतील.

जिल्हा न्यायालयात एक सत्रात कामकाज
कोरोना संक्रमणामुळे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नागपूर मुख्यालयातील सर्व न्यायालयांमध्ये १ ते २० जुलैपर्यंत केवळ एक सत्रात कामकाज केले जाणार आहे. या कालावधीतील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी १ ते ४ या वेळेत केवळ अत्यंत तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी घेतली जाणार आहे. न्यायालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कामकाज सुरू होण्याच्या अर्धा तास आधी यावे लागेल व कामकाज संपल्यानंतर अर्धा तास जास्त न्यायालयात थांबावे लागेल. न्यायाधीशांनी जास्तीत जास्त कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करावे व त्यासाठी वकिलांना प्रोत्साहन द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी परिपत्रक जारी केले आहे.

Web Title: Nagpur High Court's July schedule announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.