नागपूरमध्ये देशाची ‘लॉजिस्टिक’ राजधानी बनण्याची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 08:56 PM2021-10-22T20:56:03+5:302021-10-22T20:56:42+5:30

Nagpur News नागपूरमध्ये देशाची ‘लॉजिस्टिक’ राजधानी बनण्याची क्षमता असून वर्धा येथील सिंदीच्या (रेल्वे) ड्रायपोर्टमध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कमुळे या दिशेने वाटचाल सुरू झाली, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Nagpur has the potential to become the country's 'logistics' capital | नागपूरमध्ये देशाची ‘लॉजिस्टिक’ राजधानी बनण्याची क्षमता

नागपूरमध्ये देशाची ‘लॉजिस्टिक’ राजधानी बनण्याची क्षमता

Next
ठळक मुद्देसिंदी (रेल्वे) येथील ड्रायपोर्टसंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ‘जेएनपीटी’त सामंजस्य करार

नागपूर : नागपूर शहर देशाच्या हृदयस्थानी असून येथील दळणवळणाच्या सुविधा लक्षात घेता भविष्यात मोठ्या संधी आहेत. नागपूरमध्ये देशाची ‘लॉजिस्टिक’ राजधानी बनण्याची क्षमता असून वर्धा येथील सिंदीच्या (रेल्वे) ड्रायपोर्टमध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कमुळे या दिशेने वाटचाल सुरू झाली, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) यांच्यादरम्यान शुक्रवारी सिंधी (रेल्वे) येथील ड्रायपोर्टमध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क स्थापन करण्यासंदर्भातील सामंजस्य करार झाला. त्यावेळी ते बोलत होते. (Nagpur has the potential to become the country's 'logistics' capital, Nitin Gadkari)

यावेळी राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, खा. रामदास तडस, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, ‘जेनपीटी’चे अध्यक्ष संजय सेठी, नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडचे संचालक के. सतिनाथन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या लॉजिस्टिक विभागाचे संयुक्त सचिव सुमन प्रसाद सिंग, सीईओ प्रकाश गौर, महापौर दयाशंकर तिवासी, वर्धा जि.प. अध्यक्षा सरिता गाखरे प्रामुख्याने उपस्थित होते.

या मल्टी मॉडेल पार्कच्या माध्यमातून जगभरात निर्यातीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आपल्या देशात निर्यातीसाठीचा वाहतूक खर्च कमी करण्यासाठी मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क सहायक ठरतील. मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कला रेल्वेसोबतच समृद्धी महामार्गदेखील जोडला जाणार असल्याने याचा थेट फायदा शेतकरी आणि व्यापारीवर्गाला मिळेल. या निर्यात सुविधेचा फायदा घेण्यासाठी विदर्भातील उद्योग व्यापार संघटना, लघुउद्योग भारती, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन या सर्व उद्योग संघटनांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहन गडकरी यांनी केले. तसेच या पार्कमुळे पाच वर्षांत ५० हजार रोजगार संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला.

केदारांची गडकरींवर स्तुतिसुमने

सुनील केदार यांनी भाषणादरम्यान गडकरींच्या कार्यशैलीची प्रशंसाच केली. गडकरी हे इतर राजकारण्यांहून वेगळे आहे. त्यांनी केवळ वर्ध्याच्या विकासाचे स्वप्नच पाहिले नाही, तर ते पूर्णदेखील करून दाखविले. आपल्या कामाने गडकरींनी सर्वच राजकारण्यांना शिकवण दिली आहे. विकासाच्या बाबतीत ते स्वत:ही स्वस्थ बसत नाहीत व इतरांनादेखील बरोबर कामाला लावतात. लॉजिस्टिक पार्कसाठी राज्य शासनाकडून पूर्ण मदत मिळवून देऊ, असे आश्वासन केदार यांनी दिले.

देशातील पेट्रोलपंप बंद व्हावेत

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता पर्यायी इंधनाची गरज निर्माण झाली आहे. इथेनॉल, मिथेनॉल, सीएनजी, बायो एलएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. या पर्यायांचा स्वीकार करावाच लागणार असून सरकार त्या दिशेने काम करत आहे. पेट्रोल, डिझेलची ८० टक्क्यांची आयात संपवून ती शून्य टक्क्यांवर आणली जावी. देशात पर्यायी इंधन उपलब्ध होऊन पेट्रोलपंप बंद झाले पाहिजेत, अशी माझी इच्छा असल्याचे प्रतिपादन गडकरी यांनी केले.

नागपूर-हैदराबाद एक्स्प्रेस हायवे साकारणार

आगामी काही महिन्यांत नागपूर-हैदराबाद एक्स्प्रेस हायवे बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. किसान रेल्वेच्या माध्यमातून बांगलादेशला संत्र्यांची निर्यात होत असे. संत्र्यांच्या निर्यातीवर कर कमी करण्याबाबत बांगलादेशच्या गृहमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

Web Title: Nagpur has the potential to become the country's 'logistics' capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.