नागपूर पदवीधर मतदारसंघ; महाविकासआघाडीचे अभिजित वंजारी बहुमताने विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 02:27 PM2020-12-04T14:27:03+5:302020-12-04T15:30:36+5:30

Nagpur News Nagpur graduate constituency विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाआघाडीचे अभिजित वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

Nagpur graduate constituency results announced; Vijayshree on the neck of Congress candidate Abhijit Vanjari | नागपूर पदवीधर मतदारसंघ; महाविकासआघाडीचे अभिजित वंजारी बहुमताने विजयी

नागपूर पदवीधर मतदारसंघ; महाविकासआघाडीचे अभिजित वंजारी बहुमताने विजयी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाआघाडीचे अभिजित वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये 17व्या एलिमिनेशन फेरीनंतर कोटा पूर्ण केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार  अभिजित वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. 17 व्या एलिमिनेशन फेरीनंतर अभिजित वंजारी यांना 61 हजार 701 तर भाजपचे संदीप जोशी यांना 42 हजार 791 मते मिळाली. या निवडणुकीसाठी 60 हजार 747 मतांचा कोटा ठरवण्यात आला होता. मतदारांनी दिलेल्या या कौलाचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस व महाआघाडीला निश्चितच होईल असा विश्वास अभिजित वंजारी यांनी व्यक्त केला आहे.  

गुरुवारी दुपारी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्याच फेरीत वंजारी यांनी ४ हजार ८५० मतांची आघाडी घेतली. पहिल्या फेरीत वंजारी यांना १२,६१७ तर जोशी यांना ७,७६७ मते मिळाली. दुस?्या फेरीतही वंजारी यांच्या मताधिक्यात २ हजार ४१२ ची भर पडली. दुसऱ्या फेरीअखेर एकूण ५१ हजार २३१ मतांची मोजणी पूर्ण झाली. त्यातील तब्बल ४ हजार ७६९ मते अवैध ठरली. 

नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड मानला जातो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या दिग्गज व नामवंत नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आजवर हा मतदारसंघ भाजपने एकतर्फी जिंकला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे व या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अनिल सोले यांचे तिकीट कापत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना संधी देण्यात आली. या मतदारसंघात भाजपची व्होट बँक पक्की आहे. उमेदवार बदलला तरी काहीच फरक पडत नाही, असा दावा भाजपची रणनीती आखणाऱ्या नेत्यांकडून करण्यात आला होता. मात्र, तिसऱ्या फेरीअखेरही भाजपची पीछेहाट पाहता रणनीती फसल्याचे दिसून आले.

 

Web Title: Nagpur graduate constituency results announced; Vijayshree on the neck of Congress candidate Abhijit Vanjari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.