नागपूरमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध महापौर जोशी वाद पेटला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 03:07 AM2020-07-04T03:07:53+5:302020-07-04T03:08:19+5:30

एनएसएससीडीसीएलचे सीईओ पद आपण सरकारच्या आदेशानुसार स्वीकारल्याचे आयक्त मुंढे यांनी सांगितल्यानंतर महापौर जोशी यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन एनएसएससीडीसीएलच्या संचालक मंडळाची बैठक येत्या १० जुलै असून विषयपत्रिकेत मुंढे यांची सीईओपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आहे.

In Nagpur, a dispute broke out between Commissioner Tukaram Mundhe and Mayor Joshi | नागपूरमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध महापौर जोशी वाद पेटला

नागपूरमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध महापौर जोशी वाद पेटला

Next

नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएसएससीडीसीएल) कार्यकारी अधिकारी पदावरून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर संदीप जोशी यांच्यातील वाद पेटला आहे.

एनएसएससीडीसीएलचे सीईओ पद आपण सरकारच्या आदेशानुसार स्वीकारल्याचे आयक्त मुंढे यांनी सांगितल्यानंतर महापौर जोशी यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन एनएसएससीडीसीएलच्या संचालक मंडळाची बैठक येत्या १० जुलै असून विषयपत्रिकेत मुंढे यांची सीईओपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मुंढे यांनी सीईओपद नियमबाह्यरीत्या बळकावल्याचे सिद्ध झाले, असे सांगितले.
नियमबाह्य कामे केल्याप्रकरणी आयुक्तांवर जोशी यांनी तोफ डागली. स्मार्ट सिटीच्या अजेंड्यावरून सीईओपद नियमबाह्य असून त्यांनी १८ कोटींची देयके एका कंपनीला कुठल्या अधिकारात दिली? कामाची बिले देण्याबाबत यापूर्वीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाला होता, असे आयुक्त म्हणतात. मागील संचालक मंडळाच्या बैठकीत ज्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली होती, त्यांना कसे काय काढले? असेही महापौर म्हणाले.

 

Web Title: In Nagpur, a dispute broke out between Commissioner Tukaram Mundhe and Mayor Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.