नागपूर जिल्ह्यात तरुणाचा प्रेमप्रकरणातून खून : तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 08:50 PM2019-10-11T20:50:46+5:302019-10-11T21:22:29+5:30

प्रियकर त्याच्या प्रेयसीच्या घरी दिसताच तिघांनी त्याला घरात बंद करून बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याच्या डोक्यावर काठी व पेचकसने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Murder of young man in love affair at Nagpur district: Three arrested | नागपूर जिल्ह्यात तरुणाचा प्रेमप्रकरणातून खून : तिघांना अटक

नागपूर जिल्ह्यात तरुणाचा प्रेमप्रकरणातून खून : तिघांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देकाठी व पेचकसने केले डोक्यावर वार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (गुमथळा) : प्रियकर त्याच्या प्रेयसीच्या घरी दिसताच तिघांनी त्याला घरात बंद करून बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याच्या डोक्यावर काठी व पेचकसने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मौदा तालुक्यातील सावळी (ता. कामठी) येथे घडली असून, या प्रकरणात तिघांना अटक केली आहे.
आकाश ऊर्फ गोलू श्रावण सोनटक्के (२३, रा. भूगाव, ता. कामठी) असे मृत तरुणाचे नाव असून, गजानन चरणदास शेंडे, पंकज शेंडे व दिनेश महतो (मूळचा बिहार येथील रहिवासी), तिघेही रा. सावळी, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गोलू वडोदा (ता. कामठी) येथील वंजारी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्कूलबसवर कंडक्टर म्हणून नोकरी करायचा. त्याची सावळी येथील इयत्ता ११ वीतील विद्यार्थिनीशी मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.
ही बाब दिनेशला माहीत असल्याने त्याने ती विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना सांगितली. शिवाय, त्यांना गोलूच्या विरोधात भडकवून दिले. दरम्यान, गोलू व त्याचा मित्र पीयूष नंदकिशोर चरडे (२१, रा. भूगाव) रविवारी (दि. ६) दुपारी सावळी येथे तिला भेटायला आले होते. पीयूषने गोलूला तिच्या घरी सोडले आणि मोटरसायकल घेऊन बाजूला उभा राहिला. गोलूने तिच्या घरात प्रवेश करताच तिच्या कुटुंबीयांनी दोघांनाही घेरले. मात्र, पीयूषने स्वत:ची सुटका करवून घेत पळ काढला.
घराचे दार आतून बंद करून गजानन, पंकज व दिनेशने गोलूला मारहाण करायला सुरुवात केली. त्यांनी गोलूच्या डोक्यावर काठी व पेचकसने जबर वार केले. गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुद्ध पडला. त्यातच शेतातील उसात लपून बसलेल्या पीयूषने पोलिसांना तसेच भूगाव येथील त्याच्या मित्रांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता, त्यांना गोलू अंगणात जखमी अवस्थेत पडला असल्याचे दिसले. त्यांनी त्याला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिथे उपचारादरम्यान त्याचा शुक्रवारी (दि. ११) सकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी सुरुवातीला भादंवि ३०७ आणि नंतर ३०२ अन्वये गुन्हा नोंदवून तिघांना अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार मधुकर गीते करीत आहेत.
आरोपींची पोलीस कोठडी
गोलू सुरुवातीपासूनच बेशद्धावस्थेत होता. या प्रकरणात पोलिसांनी घटनेच्या दिवशी तिघांना अटक केली होती. त्यांना पोलिसांनी मौदा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. या काळात त्यांच्याकडून त्यांनी मारहाणीसाठी वापरलेली काठी व पेचकस जप्त करण्यात आले. पे्रयसीचे कुटुंबीय गरीब असून, त्यांची गोलूला जीवे मारण्याची मुळीच इच्छा नव्हती. मात्र, दिनेश महतोच्या चिथावणीमुळे हा प्रकार घडल्याची तसेच ही घटना पीयूष चरडेमुळे उघड झाल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.

Web Title: Murder of young man in love affair at Nagpur district: Three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.