विनयभंग : सरपंचाची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 10:45 PM2021-06-14T22:45:47+5:302021-06-14T22:46:16+5:30

Molestation , Sarpanch sent to jail रामटेक तालुक्यातील काचुरवाही ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश राऊत यांनी गावातीलच एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (दि. १२) रोजी सायंकाळी घडली होती.

Molestation: Sarpanch sent to jail | विनयभंग : सरपंचाची कारागृहात रवानगी

विनयभंग : सरपंचाची कारागृहात रवानगी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : रामटेक तालुक्यातील काचुरवाही ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश राऊत यांनी गावातीलच एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (दि. १२) रोजी सायंकाळी घडली होती. या घटनेच्या संबंधाने राऊत यांच्यावर विनयभंग व अन्य आरोपावरून गुन्हा दाखल करून रविवारी अटक करण्यात आली होती.
सोमवारी कामठी येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमक्ष आरोपी राऊत यांना हजर करण्यात आले होते. न्यायालयाने राऊत यांना मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणी सविस्तर वृत्त असे की पीडित महिला व सरपंच राऊत काचुरवाही या गावातील रहिवासी आहेत. सरपंच पीडित महिलेच्या घराजवळ गेले व तिच्या पतीला बाहेर बोलावून महिलेबाबत अपशब्द बोलून त्याचा हात मुरगळला. नेमक्या त्याच वेळेस महिला घरातून बाहेर आली व तिने याबाबत जाब विचारला. यावर सरपंचाने अश्लील हातवारे करीत शिवीगाळ केली. यासंदर्भात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सरपंचाविरुद्ध भादंवि कलम ३५४, २९४, ३२३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करीत अटक केली होती. नियमाप्रमाणे सोमवारी राऊत यांना कामठी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत मध्यवर्ती कारागृहात केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सीमा बेंद्रे करीत आहेत.

यापूर्वीसुद्धा सरपंचाने गावातीलच एका महिलेला आधार कार्ड बनवून देण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपावरून वाद झाला होता. त्यामुळे संतापलेल्या त्या महिलेच्या घरच्या लोकांनी सरपंचाला चोप दिला होता. तेव्हाही त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र त्यावेळी राऊत यांनी सक्षम न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला होता.

Web Title: Molestation: Sarpanch sent to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.