‘मोदी है तो मुमकिन है’ यात तथ्यच! मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 04:15 AM2019-08-16T04:15:31+5:302019-08-16T04:17:31+5:30

देशातील लोक म्हणतात ‘मोदी है तो मुमकिन है,’ यात तथ्यच आहे.

'Modi hai to mumkin hai' is True! Mohan Bhagwat | ‘मोदी है तो मुमकिन है’ यात तथ्यच! मोहन भागवत

‘मोदी है तो मुमकिन है’ यात तथ्यच! मोहन भागवत

Next

नागपूर : देशातील लोक म्हणतात ‘मोदी है तो मुमकिन है,’ यात तथ्यच आहे. कलम ३७० हटविण्यासंदर्भात नागरिकांची इच्छाशक्ती प्रबळ होती, त्यामुळेच सत्तेवर बसलेल्या धुरिणांना तसे काम करण्याची शक्ती मिळाली. देशाचे स्वातंत्र्य जसे असावे, असे आपल्याला वाटत होते त्याचा अनुभव आता येतो आहे, असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर पाठ थोपटली.
गुरुवारी त्यांनी रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात तिरंगा फडकविला. या वेळी संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

‘यस व्ही कॅन’चा नारा
सद्य:स्थितीत देशाच्या नेतृत्वात जी संकल्पशक्ती आहे तिला समाजाच्या इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. यातूनच जनतेमध्ये विश्वास निर्माण होतो. ‘यस व्ही कॅन’चा भाव उत्पन्न होतो. देश महाशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून महासत्ता झाल्यानंतरही देशातील प्रत्येक घटकाची ओळख भारतात जपली जाईल. तसेच भारत जगातील इतर राष्ट्रांवर दबाव न बनवता त्यांची सुरक्षा करेल, असेदेखील डॉ. भागवत म्हणाले.

इम्रान खानने हिंदूंना ललकारले आहे - भय्याजी जोशी
संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते संघ मुख्यालयात झेंडावंदन झाले. या वेळी ते म्हणाले, अनेक वर्षांपासून अनेक गोष्टींची प्रतीक्षा होती. सरकार त्यादृष्टीने काम करीत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संघाची तुलना हिटलरशाहीशी केली. त्यामुळे इम्रानने एक प्रकारे हिंदू समाजालाच आव्हान दिले आहे. सरकार याचे योग्य उत्तर देईल, असे ते म्हणाले.
 

Web Title: 'Modi hai to mumkin hai' is True! Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.