चिमुकली ! पण, तिच्या नृत्याचा थरार सर्वांना करतो अचंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 07:42 PM2019-11-13T19:42:45+5:302019-11-13T19:45:10+5:30

अवघ्या ५ वर्षाच्या इशिताने एका प्रतिष्ठित चॅनलच्या राष्ट्रीय स्तरावरील टॅलेंट शो मध्ये आपल्या नृत्यकौशल्याने सर्वांची मने जिंकली. शहरात ती लिटील डान्सर म्हणून प्रसिद्ध आहे.

Minor Girl ! But, the thrill of her dance surprised everyone | चिमुकली ! पण, तिच्या नृत्याचा थरार सर्वांना करतो अचंबित

चिमुकली ! पण, तिच्या नृत्याचा थरार सर्वांना करतो अचंबित

Next
ठळक मुद्देइशिताची राष्ट्रीय स्तरावर भरारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माहिती आणि तंत्रज्ञानामुळे आजच्या पिढीतील लहान मुलांची आकलन क्षमता प्रचंड वाढली आहे. बालपणापासूनच मुले मोठमोठे स्टेज शो गाजवित आहे. या लहानग्या कलावंतांच्या यादीत नागपूरच्या इशिताचाही समावेश व्हायला लागला आहे. अवघ्या ५ वर्षाच्या इशिताने एका प्रतिष्ठित चॅनलच्या राष्ट्रीय स्तरावरील टॅलेंट शो मध्ये आपल्या नृत्यकौशल्याने सर्वांची मने जिंकली. शहरात ती लिटील डान्सर म्हणून प्रसिद्ध आहे. 


बेसा रोडवरील शाहूनगर येथे राहणारी इशिता महेंद्र बरवड प्रेरणा कॉन्व्हेंटची केजीची विद्यार्थिनी आहे. पण या पोरीला नृत्याचे भलतेच वेड आहे. तिला धड बोलताही येत नव्हते, या वयात ती थिरकायला लागली होती. टीव्हीवरील नृत्याचे शो बघून, स्वत:च त्याचा सराव ती घरात करायला लागली. पोरीची नृत्यातील आवड बघून, आईवडिलांनी तिला प्रोत्साहित केले. नृत्य प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण मिळवून दिले. त्यामुळे तिचे नृत्य आणखी बहरले. नृत्याच्या कॉन्टेम्पररी स्टाईलमध्ये आज ती बेधडक स्टेज शो गाजविते. नागपुरात झालेल्या कीड्स फेस्टिव्हलमध्ये तिने उत्कृष्ट सादरीकरण केले. सेंट्रल इंडिया डान्स चॅम्पियनशीमध्ये तिने चांगलाच प्रभाव पाडला. राज्यस्तरावरील डान्स स्पर्धेत तिच्या नृत्याने परीक्षकांना दखल घेण्यास भाग पाडले. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून मोठमोठ्यांना लाजवेल असा तिच्या नृत्याचा थरार आहे. २६ आॅगस्ट रोजी न्यू इंडिया डान्स फेडरेशनच्यावतीने वर्धेत झालेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत तिने उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. स्थानिक, विभागीय, राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर अवघ्या ५ वर्षाच्या पोरीने आपल्या टॅलेंटने पटकाविलेले पारितोषिक वाखाणण्याजोगे आहे.
आता एका प्रतिष्ठित चॅनलच्या इंडिया टॅलेंट फाईट शोच्या सेमीफायनलसाठी तिची निवड झाली. उत्तराखंड येथील रुडकी येथे संपन्न झालेल्या सेमी फायनल राऊंडमध्ये तिने परीक्षकांना चांगलेच आश्चर्यचकित केले. तिचा परफॉरमन्समुळे स्पर्धेच्या टॉपटेनमध्ये नक्कीच निवड होईल, अशी अपेक्षा इशिताची आई सुचिता बरवड यांना आहे.

नृत्याप्रति तिची आवड, अवघड स्टेप्स करून घेण्याची तिची जिज्ञासा, स्टेजवरील तिचे डेअरींग इतक्या कमी वयात मुलींमध्ये असणे, तिच्या भविष्याच्या दृष्टीने चांगले संकेत आहे. तिच्या आजपर्यंतच्या झालेल्या परफॉरमन्सवरून इशिता नक्कीच नागपूरचे नाव चमकवेल.
अक्षय चौधरी, कोरिओग्राफर

Web Title: Minor Girl ! But, the thrill of her dance surprised everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.