मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील उद्योग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:49 AM2020-06-13T00:49:14+5:302020-06-13T00:52:03+5:30

मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील सुमारे १५ कंपन्यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यासोबतच विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील १२ आरोग्य, शिक्षण, दळणवळण आदी क्षेत्रातील कामकाज सुरू झाले आहे.

Mihan's special economic zone industry started | मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील उद्योग सुरु

मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील उद्योग सुरु

googlenewsNext
ठळक मुद्दे‘मिशन बिगीन अगेन’ १५ उद्योगांमध्ये उत्पादनाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘लॉकडाऊन’चा औद्योगिक क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. राज्य शासनाने ‘मिशन बिगीन अगेन’नुसार शारीरिक अंतरासह कोरोनाच्या संदर्भातील आवश्यक सर्व उपाययोजना लागू केल्यानंतर उद्योग सुरू करण्याला परवानगी दिली आहे. त्यानुसार मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील सुमारे १५ कंपन्यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यासोबतच विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील १२ आरोग्य, शिक्षण, दळणवळण आदी क्षेत्रातील कामकाज सुरू झाले आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी येथील मिहान प्रकल्पात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत विविध कंपन्यांनी कामाला सुरुवात केली आहे. यामध्ये रिलायन्स (थाल्स), मेटाटेक, एअर सिस्टीम, इंडिया प्रा. लि., प्रवेश एक्सपोर्ट प्रा. लि. या कंपन्या १०० टक्के कर्मचारी उपस्थितीसह तसेच ताल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन लि., रिलायन्स (डीआरएएल), कनव अ­ॅग्रो, डाएट फूड इंटरनॅशनल, स्टेनोस्पेअर इंडिया प्रा. लि. आदी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीनुसार सुरू झाल्या असून या कंपन्यांमध्ये २८ ते ७५ टक्के कर्मचारी व कामगार हजर आहेत. एअर इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये ८० कर्मचारी व १०० कामगार हजर असून नियमित कामाला सुरुवात झाली आहे. इतर उद्योगांमध्ये लुपिन लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजी, एक्झाविअर बीसीएस इन्फोसिस लि., टीसीएस लि., टेक महिन्द्रा आदी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग समूहांनी कामकाजाला सुरुवात केली आहे. यापैकी बहुतांश ‘वर्क फ्रॉम होम’ यानुसार उद्योगाचे नियमित कामकाज सुरू आहे.
मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर एम्स नागपूर, बीसीसीएल, बीपीएस, कॉन्कोर, डी.वाय. पाटील स्कूल, एफएससी महिन्द्रा डेव्हलपर प्रा.लि., मोराज इन्फ्रा प्रा.लि., प्लेनमटेट, टीसीआय इन्फ्रा लि., शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, भारतीय विद्या भवन आदी १२ सेवा क्षेत्रातील उद्योगांमध्ये ‘मिशन बिगीन अगेन’नुसार सुरुवात झाली आहे. मिहानच्या मध्यवर्ती सुविधा केंद्रामध्ये असलेले विकास आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण प्रकल्प अल्टिएस, एसबीआय बँक, कॅनरा बँक, बालाजी सर्व्हिसेस येथेही सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आदींचा वापर करुन शासनाच्या विहित सूचनेनुसार कामकाज सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे तांत्रिक सल्लागार एस. व्ही. चहांदे यांनी दिली.

Web Title: Mihan's special economic zone industry started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.