नागपुरात विमानाची मेडिकल इमर्जन्सी लॅण्डींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 12:07 AM2020-02-01T00:07:32+5:302020-02-01T00:08:47+5:30

भुवनेश्वर येथून मुंबईकडे जात असलेल्या विमानाला शुक्रवारी रात्री नागपुरात मेडिकल इमर्जन्सी लॅण्डीग करावी लागली. विमानात आजारी महिलेला तात्काळ खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले.

Medical emergency landing of the aircraft in Nagpur | नागपुरात विमानाची मेडिकल इमर्जन्सी लॅण्डींग

नागपुरात विमानाची मेडिकल इमर्जन्सी लॅण्डींग

Next
ठळक मुद्देमहिला प्रवासी खाजगी इस्पितळात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भुवनेश्वर येथून मुंबईकडे जात असलेल्या विमानाला शुक्रवारी रात्री नागपुरात मेडिकल इमर्जन्सी लॅण्डीग करावी लागली. विमानात आजारी महिलेला तात्काळ खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर रात्री ११.१६ वाजता विमान मुंबईकडे रवाना झाले.
प्राप्त माहितीनुसार गो एअरची भुवनेश्वर-मुंबई फ्लाईट (जी८-२४७)मध्ये सवात महिला प्रवासी ज्योतिमयी दास (८०) यांना अचानक रक्तदाबाची समस्या उद्भवली. याची माहिती मिळताच विमानाच्या पायलटने तात्काळ नागपूरच्या आकाश नियंत्रण यंत्रणेशी संपर्क साधून नागपुरात लॅण्डींग करण्याची परवानगी मागीतली आणि रात्री १०.३० वाजता विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यानंतर आजारी महिला प्रवासी ज्योतीमयी दास यांना रामदासपेठेतील खाजगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ज्योतिमयी आपल्या मुलीसोबत प्रवास करत होत्या. ज्योतिमयी दास यांना भर्ती केल्यानंतर विमानाने रात्री ११.१६ वाजता मुंबईकडे उड्डाण भरली. यासोबतच, गो एयरची नागपूर-बेंगरूळू फ्लाईट (जी८-८१२)ची उड्डाण तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आली.

Web Title: Medical emergency landing of the aircraft in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.