नागपुरातील राजनगरमध्ये सापडला एमडी तस्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:11 PM2019-08-13T23:11:11+5:302019-08-13T23:12:54+5:30

एनडीपीएस सेलने रेव्ह पार्टी व युवकांना एमडीचा पुरवठा करणाऱ्या एका युवकाला सदर परिसरातील राजनगर येथे पकडले. कारमध्ये डिलेव्हरी देण्यासाठी तो आला होता. त्याच्याकडून ४.३० लाख रुपयांचा माल जप्त केला.

MD smuggler found in Rajnagar in Nagpur | नागपुरातील राजनगरमध्ये सापडला एमडी तस्कर

नागपुरातील राजनगरमध्ये सापडला एमडी तस्कर

Next
ठळक मुद्देकारने येत होता डिलेव्हरी द्यायला : मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एनडीपीएस सेलने रेव्ह पार्टी व युवकांना एमडीचा पुरवठा करणाऱ्या एका युवकाला सदर परिसरातील राजनगर येथे पकडले. कारमध्ये डिलेव्हरी देण्यासाठी तो आला होता. त्याच्याकडून ४.३० लाख रुपयांचा माल जप्त केला. आरोपी फ्रेंड्स कॉलनी गिट्टीखदान येथील ३२ वर्षीय अफजल ऊर्फ अरबाज ऊर्फ जासीम जहीन खान आहे.
पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले की, अफजलचे नाव बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. एका आरोपीच्या हत्येच्या प्रकरणात तो संशयाच्या घेऱ्यात आला होता. परंतु पुराव्याअभावी त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांना बºयाच दिवसांपासून तो एमडी तस्करी करीत असल्याची माहिती होती. अरबाज फक्त विश्वासातील लोकांनाच डिलिव्हरी देत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी योजना आखली होती.
पोलिसांनी डमी ग्राहकाला अरबाजकडे पाठविले. त्याने ग्राहकाला सोमवारी रात्री १२ वाजता राजनगरातील अचरज रिट्रीट अपार्टमेंटजवळ बोलाविले. अरबाज कारने तिथे पोहचला. १० ग्राम एमडीसाठी त्यांचा ३० हजार रुपयांत सौदा झाला. तेव्हाच पोलिसांनी छापा टाकून अरबाजला अटक केली. त्याच्याजवळील एमडी व कार जप्त केली. सूत्रांच्या मते अरबाजची सखोल चौकशी केली असता, एमडी तस्करीच्या मोठ्या नेटवर्कचा खुलासा होऊ शकतो. त्याच्या वडिलांविरुद्धसुद्धा फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे. अरबाजला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्याबरोबर त्याचे वडील गुन्हे शाखेत पोहचले. परंतु वडिलांना परत पाठविण्यात आले. पोलिसांनी अरबाजविरुद्ध मादक पदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई अप्पर आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने, एसीपी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक राजेंद्र निकम, सहा. पोलीस निरीक्षक विजय कसोधन, विठोबा काळे, अर्जुनसिंह ठाकूर, हवलदार दत्ता बागुल, तुळशीदास शुक्ला, प्रदीप पवार, सतीश पाटील, शिपाई नितीन मिश्रा, नितीन साळुंखे, नरेश शिंगणे, तसेच रुबिना यांनी केली.
एका महिलेवरही संशय
परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये अरबाजला ओळखणारी महिला राहते. तीसुद्धा बऱ्याच काळापासून मादक पदार्थाच्या तस्करीत व अवैध धंद्यामध्ये लिप्त आहे. पोलीस तिच्या फ्लॅटवर पाळत ठेवून होते. परंतु फ्लॅटला कुलूप असल्यामुळे पोलीस परतले. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेचे शहरात मोठे नेटवर्क आहे. शहरातील व्यापाऱ्यांची मुले तिच्याशी जुळलेली आहे. या प्रकरणाची चौकशी केली असता, अनेक खुलासे होऊ शकतात, पोलीससुद्धा त्याच दिशेने तपास करीत आहे.

 

Web Title: MD smuggler found in Rajnagar in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.