नागपुरात एमडी तस्करीत मॉडेलला साथीदारासह अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:03 AM2019-09-03T00:03:24+5:302019-09-03T00:04:31+5:30

गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने एमडी तस्करीत एका २० वर्षीय मॉडेलला तिच्या साथीदारासह अटक केली. ही कारवाई सोमवारी सकाळी ११ वाजता अमरावती रोडवरील बोले पेट्रोल पंप चौकातील बसस्टॅण्डवर करण्यात आली.

MD smuggled model arrested in Nagpur along with partner | नागपुरात एमडी तस्करीत मॉडेलला साथीदारासह अटक 

नागपुरात एमडी तस्करीत मॉडेलला साथीदारासह अटक 

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने एमडी तस्करीत एका २० वर्षीय मॉडेलला तिच्या साथीदारासह अटक केली. ही कारवाई सोमवारी सकाळी ११ वाजता अमरावती रोडवरील बोले पेट्रोल पंप चौकातील बसस्टॅण्डवर करण्यात आली.
शिवानी नंदू बानाईत रा. उदयनगर, गोलबा रेसिडेन्सी आणि बंटी ऊर्फ बग्गा शेकू अहमद खन (२७) रा. वाठोडा, अशी आरोपींची नावे आहेत. सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम यांना सकाळी एका व्यक्तीने फोन करून माहिती दिली की, सकाळी ट्रॅव्हल्स बसने एक युवक आणि तरुणी नागपुरात एमडी पावडर घेऊन येत आहे. या आधारावर पथकाने सकाळी १०.३० वाजता अमरावती रोडवरील बोले पेट्रोल पंपासमोर नजर ठेवली. सकाळी ११ वाता मुंबईवरून एक बस पोहोचली. त्यातून एक तरुण व तरुणी उतरली. पोलिसांनी दोघांनाही थांबवून त्यांची झडती घेतली. बंटीच्या बॅगमध्ये २० ग्राम आणि मॉडेल शिवानीच्या पर्समध्ये ५ ग्राम एमडी पावडर सापडली.

Web Title: MD smuggled model arrested in Nagpur along with partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.