नागपुरात ड्रग पेडलर्सकडून एमडी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 08:34 PM2020-09-18T20:34:06+5:302020-09-18T20:35:38+5:30

गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने नागपुरातील दोन ड्रग पेडलर्सना पकडून त्यांच्याकडून ७४ ग्राम एमडीसह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबईचा कुख्यात एमडी तस्कर शहाबाज रमजान खान हा नागपूरच्या ड्रग पेडलर्सना ड्रग पुरवीत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत.

MD seized from drug peddlers in Nagpur | नागपुरात ड्रग पेडलर्सकडून एमडी जप्त

नागपुरात ड्रग पेडलर्सकडून एमडी जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देदोघे जेरबंद, ७४ ग्राम एमडी जप्त : मुंबई कनेक्शन उघड : एनडीपीएसची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने नागपुरातील दोन ड्रग पेडलर्सना पकडून त्यांच्याकडून ७४ ग्राम एमडीसह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबईचा कुख्यात एमडी तस्कर शहाबाज रमजान खान हा नागपूरच्या ड्रग पेडलर्सना ड्रग पुरवीत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत.
अंकित नारायण पांडे (वय २५, साकेतनगर, रामेश्वरी) आणि नागेंद्र ऊर्फ हनी दीपक ठाकूर (रा. गुरु तेजबहादुर नगर, नारी) अशी पोलिसांनी अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत.
वर्धा मार्गावरून एमडीची मोठी खेप घेऊन काही तस्कर नागपुरात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला गुरुवारी मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. नीलेश भरणे, पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव कुरळे यांच्या नेतृत्वात एनडीपीएसच्या पथकाने गुरुवारी दुपारपासून तस्करांना पकडण्यासाठी सापळा लावला. वर्धा मार्गावरील खापरी बस डेपो जवळ एनडीपीएस चे पथक दबा धरून बसले. एमएच ४९/ एफ १८२७ क्रमांकाची होंडा अमेझ कार वर्धेकडून येताना दिसताच पोलिसांनी ती अडवली. त्यातील अंकित पांडे आणि हनी ठाकूरला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ ७४ ग्रॅम सहा मिलिग्राम (किंमत २ लाख, ९६ हजार) आणि दोन मोबाईल सापडले. आरोपींनी या गुन्ह्यासाठी जी कार वापरली तीसुद्धा पोलिसांनी जप्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडी कुठून आणले, अशी विचारणा केली असता त्यांनी कुर्ला मुंबई येथील ड्रग पेडलर्स शहाबाज रमजान खान त्याचे नाव सांगितले. पोलिसांनी त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला.
अटक करण्यात आलेला पांडे आणि ठाकूर हे दोघेही कुख्यात गुन्हेगार आहेत, हे विशेष!

शाहबाजचे कनेक्शन
शाहबाज गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर या गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेला शहाबाज रमजान खान हा कुख्यात ड्रग पेडलर्स असून त्याचे नागपूर कनेक्शन वेळोवेळी उघड झाले आहे. त्याला यापूर्वी एमडीसह नागपूर पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. तो मे पर्यंत नागपूरच्या कारागृहात बंदिस्त होता, हे विशेष!

Web Title: MD seized from drug peddlers in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.