‘एमबीए’ची प्रवेश प्रक्रिया अडखळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 10:43 AM2020-09-21T10:43:52+5:302020-09-21T10:44:18+5:30

राज्यातील अन्य विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा परिणाम एमबीएसह सर्वच स्नातकोत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवर पडला आहे. गेल्या पाच महिन्यापासून सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत, कधी सुरू होतील याचा अद्याप अंदाज नाही.

MBA admission process stalled | ‘एमबीए’ची प्रवेश प्रक्रिया अडखळली

‘एमबीए’ची प्रवेश प्रक्रिया अडखळली

Next
ठळक मुद्देमे महिन्यात लागला होता ‘सीईटी’चा निकाल

आशिष दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह राज्यातील अन्य विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा परिणाम एमबीएसह सर्वच स्नातकोत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवर पडला आहे. गेल्या पाच महिन्यापासून सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत, कधी सुरू होतील याचा अद्याप अंदाज नाही.

‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार राज्य सीईटी सेलने अंतिम वर्षाच्या परीक्षांचा निकाल जाहीर होताच, प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणत: ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात हे निकाल जाहीर होतील, असा अंदाज सेलला आहे. वास्तवात विद्यापीठाच्या अंतिम वर्ष आणि सत्राच्या परीक्षांचे निकाल ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत जाहीर होतील. त्यामुळे, ऑक्टोबरच्या दुसºया आठवड्यात प्रवेश प्रक्रिया प्रारंभ होणे अद्याप तरी अशक्य आहे. प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने विद्यार्थी आणि महाविद्यालयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. उशीर होत असल्याच्या स्थितीत विद्यार्थी मुक्त विद्यापीठाकडे वळण्याच्या शक्यतेने तोटा होण्याची भीती महाविद्यालयांना आहे. त्यातच अनेक विद्यार्थी खासगी विद्यापीठांकडे वळत आहेत. त्याचा परिणाम महाविद्यालयांतील जागा रिकाम्या राहण्याची शक्यता आहे. त्यातच प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा दबाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

दोन सत्रांचा सामना एकसाथ करावा लागेल
: प्रवेश प्रक्रियेला उशीर होत असल्याने, दोन सत्रांच्या परीक्षा एकसाथ देण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. विद्यापीठांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये सुरू होतात. परंतु, यंदा प्रथम सत्राच्या परीक्षा मार्च पर्यंत ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर लागलीच दुसºया सत्राच्या परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे.

४५०० सीट्स
: नागपूर विभागात एमबीएच्या ४५०० जागा आहेत. मार्च महिन्यामध्ये झालेल्या सीईटीमध्ये विभागातून १६ हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामुळे, यंदा प्रवेशांची संख्या उत्तम राहण्याचा अंदाज महाविद्यालयांना होता. परंतु, टाळेबंदी आणि आता परीक्षांच्या आयोजनात होत असलेला उशीर, यामुळे या जागा भरण्याची शक्यता कमीच आहे.

 

Web Title: MBA admission process stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.