आयुक्त मुंढेंचा तो आदेश महापौरांनी बदलला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:36 AM2020-04-03T00:36:55+5:302020-04-03T00:38:35+5:30

कॉटन मार्केटमध्ये भाजी खरेदी-विक्रीसाठी होणारी गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरू शकते, याची दखल घेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश देत कॉटन मार्केट बंद केले होते. मात्र, महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी येथील विक्रेत्यांचे म्हणणे ऐकून घेत कॉटन मार्केट सुरू करण्याचे आदेशदिले आहेत.

The mayor changed the commission order | आयुक्त मुंढेंचा तो आदेश महापौरांनी बदलला 

आयुक्त मुंढेंचा तो आदेश महापौरांनी बदलला 

Next
ठळक मुद्देकॉटन मार्केट तातडीने सुरू करण्याचे दिले आदेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कॉटन मार्केटमध्ये भाजी खरेदी-विक्रीसाठी होणारी गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरू शकते, याची दखल घेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश देत कॉटन मार्केट बंद केले होते. मात्र, महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी येथील विक्रेत्यांचे म्हणणे ऐकून घेत कॉटन मार्केट सुरू करण्याचे आदेशदिले आहेत. एकप्रकारे आयुक्तांचा आदेश महापौरांनी फिरवला आहे.
आयुक्त मुंढे यांनी कॉटन मार्केट बंद करीत येथे भाजीपाला घेऊन येणाऱ्या गाड्या शहरातील विविध भागात थेट विक्रीसाठी पाठिवण्याचा उपाय योजला. त्यासाठी विविध मैदानांवर विक्रेत्यांसाठी व्यवस्था करण्यात आली. यात सोशल डिस्टन्स पाळले जात होते. मात्र, मार्केट बंद झाल्यामुळे तेथील विक्रेत्यांना याचा फटका बसू लागला. या पार्श्वभूमीवर महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी मार्केटला भेट दिली असता, कॉटन मार्केट मर्चंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे कैफियत मांडली. निर्जंतुकीकरणाच्या नावावर दोन दिवस कॉटन मार्केट बंद करण्यास मनपा प्रशासनाने सांगितले; मात्र अद्यापही ते सुरू करण्यात आले नाही, असे सांगितले.
गाड्या अधिक प्रमाणात येतात. त्यामुळे गर्दी होते, हे कारण पुढे केले जात आहे. प्रशासनाने कळमना मार्केट बंद केल्यामुळे तेथील संपूर्ण भार कॉटन मार्केटवर आला होता. आता ते मार्केट सुरू केले. शहरात इतर १० ठिकाणी मोकळ्या जागांवर मार्केट सुरू केले. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेले नागपूरच्या मध्यवर्ती भागातील कॉटन मार्केट बंद ठेवले. आम्ही सर्व नियम पाळायला तयार आहोत. सामाजिक अंतर पाळायला तयार आहोत. गाड्यांची संख्या कमी करायला तयार आहोत. मार्केटचे गेट पूर्णपणे उघडे न ठेवता अर्धवट उघडे ठेवून सुरक्षा रक्षकाच्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण ठेवायला तयार आहोत. दिवसभर मार्केट सुरू न ठेवता सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत पूर्ण व्यवसाय करायला तयार आहोत, अशी भूमिका असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी मांडली. प्रशासनाने विश्वासात न घेता, चर्चा न करता घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. याची दखल घेत महापौर जोशी यांनी कॉटन मार्केट तातडीने सुरू करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले.
टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये गाड्या सोडा
मर्चंट असोसिएशनचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महापौर जोशी यांनी मनपाचे उपायुक्त महेश मोरोणे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. शहरात इतर ठिकाणी मार्केट सुरू केल्यामुळे गर्दी विभागली गेली आहे. कॉटन मार्केट अटी आणि शर्तींच्या आधारे सुरू करायला हरकत नाही. गाड्यांची संख्या ५० किंवा १०० ठेवा किंवा टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये गाड्या सोडा, असे निर्देश दिले. मग मार्केट बंद करताना अशीच उपाययोजना आयुक्त मुंढे यांना का सुचली नाही, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: The mayor changed the commission order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.