महावितरण : राज्यात भारनियमन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 08:40 PM2019-06-03T20:40:33+5:302019-06-03T20:41:52+5:30

दीर्घकालीन वीज करार तसेच नवीन व नवीकरणीय स्रोतांमधून महावितरणला आवश्यक असलेली वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे कोयना वीज निर्मितीचा चौथा टप्पा बंद झाला तरीही विजेच्या उपलब्धतेवर कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच महावितरणकडे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असल्यामुळे राज्यात कोठेही भारनियमन होणार नाही, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

Mahavitaran: There is no load shedding in the state | महावितरण : राज्यात भारनियमन नाही

महावितरण : राज्यात भारनियमन नाही

googlenewsNext
ठळक मुद्देविजेचे प्रभावी नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दीर्घकालीन वीज करार तसेच नवीन व नवीकरणीय स्रोतांमधून महावितरणला आवश्यक असलेली वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे कोयना वीज निर्मितीचा चौथा टप्पा बंद झाला तरीही विजेच्या उपलब्धतेवर कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच महावितरणकडे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असल्यामुळे राज्यात कोठेही भारनियमन होणार नाही, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
सद्यस्थितीत महावितरणची उच्चतम विजेची मागणी ही १९००० ते १९५०० मे.वॅ. इतकी असून ती दीर्घकालीन करारांतर्गत औष्णिक वीज प्रकल्पातून व नवीन व नवीकरणीय स्रोतामधून पूर्ण करण्यात येत आहे. महावितरणकडे झीरो शेड्युलमध्ये असलेले परळी औष्णिक प्रकल्पामधील संच क्र. ६ आणि ७ व एनटीपीसी सोलापूर या औष्णिक प्रकल्पामध्ये असलेला वाटा मिळून एकूण ११४४ मे.वॅ. इतकी अतिरिक्त वीज उपलब्ध आहे. तसेच पॉवर एक्स्चेंजवर वीज उपलब्ध असल्यामुळे आणि विजेची मागणी एवढी विजेची उपलब्धता असल्याकारणाने जरी कोयना वीजनिर्मिती केंद्रामधील टप्पा क्र. ४ मधून वीज निर्मिती पूर्णपणे बंद झाली तरीही राज्यात कोठेही भारनियमनासारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही.
अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ यांनी २९ मे २०१९ रोजी कोयना धरणात पाणीसाठा अत्यल्प असल्याने व किमान १५ जुलैपर्यंत हा पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवणे आवश्यक असल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पामधून वीज निर्मिती पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीने (महानिर्मिती) २९ मे २०१९ रोजी सायंकाळापासून कोयना जलविद्युत प्रकल्पातील टप्पा क्रमांक ४ मधून वीज निर्मिती बंद करण्यात आलेली आहे. चिपळूण तालुक्यास पाणीपुरवठा नियमित चालू ठेवण्यासाठी टप्पा क्र. १ व २ मधून कमी दाबाने (४० मे.वॅटची) वीज निर्मिती करण्यात येत आहे.
महावितरण कंपनीने महाजनको, एनटीपीसी, एनपीसीआयएल, स्वतंंत्र वीज प्रकल्प व नवीन व नवीकरणीय स्रोत यांचेसोबत विविध दीर्घकालीन वीज खरेदी करार केलेले आहेत. या वीज निर्मिती स्रोतांकडून उपलब्ध होणारी वीज व विजेची मागणी लक्षात घेऊन, महावितरण कंपनी विजेची मागणी व उपलब्धता यामध्ये ताळमेळ घालत असते. राज्यात विजेची मागणी वाढल्यास किंवा काही कारणास्तव चालू असलेल्या प्रकल्पांमधून वीज निर्मिती कमी झाल्यास महावितरण कंपनीतर्फे झीरो शेड्युलमध्ये असलेले संच किंवा पॉवर एक्स्चेंजवर वीज खरेदी करून विजेच्या उपलब्धतेत वाढ करण्यात येईल व याप्रमाणे मागणी पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे राज्यात कुठेही विजेच्या उपलब्धतेमुळे भारनियमन होण्याची शक्यता नाही, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

Web Title: Mahavitaran: There is no load shedding in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.