ठळक मुद्देतृतीयपंथीयांनीही केली विदर्भाची मागणी : विदर्भाचा झेंडा फडकवला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलनरत असलेल्या विदर्भवादी संघटनांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही १ मे हा महाराष्ट्र दिन काळा दिन म्हणून पाळला. तृतीयपंथीयांनीसुद्धा काळे वस्त्र परिधान करीत स्वतंत्र विदर्भाची मागणी केली. विदर्भवाद्यांनी संविधान चौकात धरणे आंदोलन केले. संविधान चौक ते विदर्भ चंडिका मंदिरपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. विदर्भ चंडिका मंदिरात आरती करून विदर्भाचा ध्वज फडकावण्यात आला. तर दुसरीकडे अखंड महाराष्ट्राचे समर्थक असलेल्या शिवसेनेने गुलाबाचे फूल आणि मिठाई वाटून महाराष्ट्र दिन साजरा केला. अखंड महाराष्ट्र समितीनेही महाराष्ट्र दिन साजरा केला. शासनाचा जिल्ह्यातील मुख्य समारंभ नेहमीप्रमाणे कस्तूरचंद पार्कवर पार पडला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ध्वजारोहण केले. जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांमध्येसुद्धा महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम पार पडला.
विदर्भ राज्य आंदोलन समिती 


विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे महराष्ट्र दिन हा काळा दिन म्हणून पाळण्यात आला. बुधवारी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी संविधान चौक येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप, मुख्य संयोजक राम नेवले, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रंजना मामर्डे, प्रबीरकुमार चक्रवर्ती, देवीदास लांजेवार, प्रा. पुरुषोत्तम पाटील, अरुण केदार, मोरेश्वर टेंभुर्डे, धर्मराज रेवतकर, मंगलमूर्ती सोनकुसरे, अ‍ॅड. मुकेश समर्थ, विजया धोटे, रामेश्वर बुरडे, मुन्ना महाजन, सुनील चोखारे, अहमद कादर, अ‍ॅड. अविनाश काळे, रोहित हरणे, पुरुषोत्तम हगवणे आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व संचालन मुकेश मासूरकर यांनी केले,
आंदोलनात कृष्णराव भोंगाडे, विजय आगबत्तलवार, मंगलबाबू चिंडालिया, राजेंद्र आगरकर, प्रदीप धामणकर, निखील भुते, मुरलीधर ठाकरे, विष्णू आष्टीकर, राजेंद्र भूत, भगवान राठी, भय्यालाल माकडे, विनोद बाभरे, भाऊराव बन्सोड, अनिल भुरे, अरविंद बोरकर, चंद्रशेखर कुहिटे, गुलाबराव धांडे, सौरभ गभणे, नारायण काकडे, हरिराम नासरे, रामभाऊ कावडकर, रफीक रंगरेज, नरेश निमजे, गणेश शर्मा, नितीन रोंघे, संदेश सिंगलकर, अण्णाजी राजेधर, प्रवीण डांगे, हरिभाऊ मोहोड, अ‍ॅड. रेवारम बेलेकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
३ जून रोजी वीज मार्च
येत्या विधानसभा निवडणूक या आंदोलन म्हणून लढण्यात येतील. तसेच विदर्भातील वीजदर कमी करण्याच्या मागणीसाठी ३ जून रोजी संविधान चौक ते कोराडी असा ‘वीज मार्च’ काढण्यात येईल. या मार्चदरम्यान पालकमंत्री बावनकुळे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे धरणे आंदोलनादरम्यान घेण्यात आला.
संविधान चौक ते विदर्भ चंडिका बाईक रॅली 

१ मे हा महाराष्ट्र दिन काळा दिवस पाळून वेगळ्या विदर्भाकरिता संविधान चौक ते विदर्भ चंडिकापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीला राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी झेंडी दाखवून सुरुवात केली. शहरातील प्रमुख रस्त्याने फिरून ही रॅली गांधीबाग येथील विदर्भ चंडिका मंदरात पोहाचेली. तेथे आरती करून विदर्भाच्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले.
अखंड महाराष्ट्र समिती 

अखंड महाराष्ट्र समिती नागपूरच्या वतीने आयोजित महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात नागपूर विद्यापीठ ग्रंथालय परिसरातील सेनापती बापट यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व मोलमजुरी करणाऱ्या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागपुरातील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. वि. स. जोग, मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, समितीचे अध्यक्ष मधुकर कुकडे, कॉम्रेड दत्तात्रय बुचे, उमेश चेके पाटील, अरविंद सबाने, प्रमोद सोहनी, पी. के. गोतमारे व अन्य उपस्थित होते.
शिवसेनेने वाटले गुलाबाचे फूल 

महाराष्ट्र दिननिमित्त शिवसेनेने गणेशपेठ चौकात गुलाबाचे फूल आणि मिठाई वाटून महाराष्ट्र दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र स्थापना दिनाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते ध्वजारोहण वंदनाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा आदी उपस्थित होते. यावेळी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.


Web Title:  Maharashtra Day: Vidarbhawadi observed black day, Shiv Sena distributed Gulab
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.