Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील यशंवत बाजीराव यांचा काँग्रेसचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 09:11 PM2019-10-17T21:11:39+5:302019-10-17T21:12:02+5:30

काँग्रेसने हलबा समाजाला महाराष्ट्रात एकही उमेदवारी दिलेली नाही. हा हलबा समाजावर अन्याय असल्याचे कारण देत माजी आमदार डॉ. यशंवत बाजीराव यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Maharashtra Assembly Election 2019:Yashwant Bajirao from Nagpur resigns Congress | Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील यशंवत बाजीराव यांचा काँग्रेसचा राजीनामा

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील यशंवत बाजीराव यांचा काँग्रेसचा राजीनामा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसनेहलबा समाजाला महाराष्ट्रात एकही उमेदवारी दिलेली नाही. हा हलबा समाजावर अन्याय असल्याचे कारण देत माजी आमदार डॉ. यशंवत बाजीराव यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी एक वर्षापूर्वी भाजप सोडली होती.
नागपूर मध्य विधानसभा क्षेत्रात एकूण ३,२४,१५८ मतदार आहेत. त्यात एक लाखावर हलबा मतदार आहेत. तसेच शहरातील अन्य मतदार संघात प्रत्येकी २३ ते ३० हजार हलबा मतदार आहेत. महाराष्ट्रात १६ ते १७ लाख हलबा मतदार आहेत. नागपूर मध्य मधून हलबा समाजातील अनेकांनी उमेदवारी मागितली होती. परंतु यापैकी कुणालाही उमेदवारी दिली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा शहर काँग्रेस अध्यक्ष व प्रदेश काँग्रेस अध्यक्षांना पाठविल्याची माहिती बाजीराव यांनी दिली.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019:Yashwant Bajirao from Nagpur resigns Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.