Maharashtra Assembly Election 2019 : पाच वर्षांत झाली प्रगतीची आश्वासक सुरुवात  : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:16 PM2019-10-11T23:16:07+5:302019-10-11T23:17:29+5:30

नागपूर शहरात तर ७६ हजार कोटींची विकासकामे सुरू झाली. ही प्रगतीची आश्वासक सुरुवात असून अजून तर खरा ‘चित्रपट’ बाकीच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Maharashtra Assembly Election 2019: A promising start to progress in five years: Nitin Gadkari | Maharashtra Assembly Election 2019 : पाच वर्षांत झाली प्रगतीची आश्वासक सुरुवात  : नितीन गडकरी

Maharashtra Assembly Election 2019 : पाच वर्षांत झाली प्रगतीची आश्वासक सुरुवात  : नितीन गडकरी

Next
ठळक मुद्देविकास साधताना जातीभेद नको

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : लोकशाही प्रणालीत जनतेने स्वत:च्या मताची शक्ती पाहिली आहे. मागील पाच वर्षांत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चहुबाजूंनी विकास झाला. नागपूर शहरात तर ७६ हजार कोटींची विकासकामे सुरू झाली. ही प्रगतीची आश्वासक सुरुवात असून अजून तर खरा ‘चित्रपट’ बाकीच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार सुधाकर देशमुख यांच्या प्रचारासाठी बोरगाव येथे आयोजित सभेदरम्यान ते बोलत होते.
लोकसभेत आम्ही आमची पाच वर्षांतील कामे घेऊनच लोकांपर्यंत गेलो होतो. आता विधानसभेतदेखील कामेच बोलत आहेत. झालेला विकास सर्वांच्या समोर आहे. पश्चिम नागपूरचा मागील पाच वर्षांत मोठा विकास झाला. गोरेवाडा ‘झू’ला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. याशिवाय पश्चिम नागपुरातील संत्रा मार्केट, फुले मार्केट, कॉटन मार्केटला नवीन स्वरुप लवकरच मिळेल. रेल्वे स्थानकासमोरील उड्डाण पूल लवकरच पाडण्यात येईल. याशिवाय फुटाळा येथे आंतरराष्ट्रीय पातळीचा दर्जा असणारे ‘म्युझिकल फाऊंटन’ लवकरच अस्तित्वात येणार आहे. या सर्व गोष्टींसाठी मतदारांनी भक्कम पाठिंबा दिला. विकास करताना त्यात भेदभाव किंवा जातीभेद करु नये. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शाळा-महाविद्यालये उघडून स्वत:ची घरे भरण्यावरच भर दिला. जनतेचा विचारच केला नाही. नेत्यांच्या मुलांना तिकीट मिळू नये या मताचा मी आहे. नेत्याच्या मुलाला तिकीट द्या अशी जनतेतून मागणी झाली तरच विचार झाला पाहिजे, असेदेखील गडकरी म्हणाले. यावेळी प्रदीप पोहाणे, संदीप जाधव, जयप्रकाश गुप्ता, प्रगती पाटील इत्यादी पदाधिकारीदेखील उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: A promising start to progress in five years: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.