महामेट्रोचे दीक्षित यांना मानाचा ‘कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ इयर’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 10:17 PM2020-09-25T22:17:56+5:302020-09-25T22:19:45+5:30

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांची मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इयर २०२०’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. फाऊंडेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर रिसर्च स्टडीज ट्रेनिंग (फर्स्ट) कन्स्ट्रक्शन कौन्सिल, या बांधकाम व्यवसायाला मदत करणाऱ्या संस्थेतर्फे पुरस्कार दिला जाणार आहे.

Mahametro's Dixit receives prestigious 'Construction World Person of the Year' award | महामेट्रोचे दीक्षित यांना मानाचा ‘कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ इयर’ पुरस्कार

महामेट्रोचे दीक्षित यांना मानाचा ‘कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ इयर’ पुरस्कार

Next
ठळक मुद्दे२५ किमीचे काम ५० महिन्यात पूर्ण : जगात महामेट्रोच्या कार्याची दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांची मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इयर २०२०’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. फाऊंडेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर रिसर्च स्टडीज ट्रेनिंग (फर्स्ट) कन्स्ट्रक्शन कौन्सिल, या बांधकाम व्यवसायाला मदत करणाऱ्या संस्थेतर्फे पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्कार समारंभ आभासी पद्धतीने १६ आॅक्टोबरला सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
सात सदस्य असलेल्या ज्युरीने दीक्षित यांची या पुरस्काराकरिता निवड केली आहे. ज्युरी सदस्यांमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या एशिया पॅसिफिक बांधकाम विभागाचे प्रमुख बेंजामिन ब्रिन, एचडीएफसी कॅपिटल अ‍ॅडव्हायसर्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विपुल रुंगटा, आयडीएफसी प्रोजेक्ट्सचे माजी उपाध्यक्ष प्रदीप सिंह, एक्विरस कॅपिटलचेकार्यकारी संचालक विजय अग्रवाल, ऑलकार्गो लॉजिस्टिक्स पार्क प्रा.लि.चे मुख्य संचालन अधिकारी आर. के. नारायण, आयएफएडब्ल्यूपीसीए, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद अली जाना आणि अपोलो टायर्सचे विभागीय प्रमुख फरीद अहमद यांचा समावेश होता.
महामेट्रोच्यानागपूर आणि पुणे प्रकल्पाचे टीम लीडर म्हणून त्यांनी आजवर संपादित केलेल्या यशाकरिता दीक्षित यांना हा पुरस्कार दिला जात आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या एकूण ४ पैकी २ मार्गांवर प्रवासी सेवा सुरू झाली आहे. या दोन मार्गांचे अंतर २५ किमी असून ५० महिन्यांत काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण देशात या गतीने पहिल्यांदाच काम पूर्ण झाले आहे. मेट्रोने केवळ ३० महिन्यात ट्रायल रन घेतले. लॉकडाऊनच्या काळात चार स्टेशनचे काम पूर्ण केले. दीक्षित आणि महामेट्रोला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पर्यावरण संरक्षणाचे निकष पाळल्यामुळे महामेट्रोच्या स्टेशनला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलतर्फे प्लॅटिनम दर्जा मिळालाआहे. महामेट्रोच्या कामाच्या गतीची आणि गुणवत्तेची नोंद सर्वांनी घेतली आहे. तेलंगणा सरकारने वारंगल येथे मेट्रो प्रकल्प सुरू करण्याकरिता महामेट्रोची मदत मागितली आहे.

Web Title: Mahametro's Dixit receives prestigious 'Construction World Person of the Year' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.