फटका ऑनलाईनचा; तीन हजारासाठी गमावले १.५७ लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 10:56 AM2021-02-25T10:56:01+5:302021-02-25T10:56:22+5:30

Nagpur News गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीत एका व्यक्तीने आपल्या घरातील ओव्हन ऑनलाइन विकण्याची तयारी दर्शविली; परंतु आरोपीने ते तीन हजारात विकत घेण्याचे आमीष दाखवून १ लाख ५७ हजाराचा चुना लावला.

Lost Rs 1.57 lakh for Rs 3,000 | फटका ऑनलाईनचा; तीन हजारासाठी गमावले १.५७ लाख रुपये

फटका ऑनलाईनचा; तीन हजारासाठी गमावले १.५७ लाख रुपये

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क   

नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीत एका व्यक्तीने आपल्या घरातील ओव्हन ऑनलाइन विकण्याची तयारी दर्शविली; परंतु आरोपीने ते तीन हजारात विकत घेण्याचे आमीष दाखवून १ लाख ५७ हजाराचा चुना लावला. रेखा आलोक अग्रवाल (५१) रा. वायुसेनानगर, यांनी त्यांच्या घरातील ओव्हन विकण्यासाठी ते ओएलएक्सवर जाहिरात दिली. आरोपी माबोइलधारकाने ते ३ हजार रुपयात विकत घेण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी फिर्यादीला क्युआर कोड पाठवून ते स्कॅन करण्यासाठी सांगितले. या माध्यमातून त्याने फिर्यादीच्या खात्यातून १ लाख ५७ हजार रुपये लंपास केले. गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Lost Rs 1.57 lakh for Rs 3,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.