विदर्भ साहित्य संघाचे वाङ्म‌य पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 11:20 PM2020-12-28T23:20:44+5:302020-12-28T23:23:20+5:30

Vidarbha Sahitya Sangh Literary award announced विदर्भ साहित्य संघातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्म‌य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ‘पंगतीतलं पान’ या कादंबरीसाठी अविनाश कोल्हे यांना पु. य. देशपांडे स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून, चंद्रकांत वानखडे यांना ‘गांधी का मरत नाही’ या ग्रंथासाठी म.म. डॉ. वा.वि. मिराशी स्मृती वैचारिक वाङ्म‌य पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

Literary award of Vidarbha Sahitya Sangh announced | विदर्भ साहित्य संघाचे वाङ्म‌य पुरस्कार जाहीर

विदर्भ साहित्य संघाचे वाङ्म‌य पुरस्कार जाहीर

Next
ठळक मुद्दे ९८ व्या वर्धापनदिनी पुरस्कार प्रदान सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भ साहित्य संघातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्म‌य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ‘पंगतीतलं पान’ या कादंबरीसाठी अविनाश कोल्हे यांना पु. य. देशपांडे स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून, चंद्रकांत वानखडे यांना ‘गांधी का मरत नाही’ या ग्रंथासाठी म.म. डॉ. वा.वि. मिराशी स्मृती वैचारिक वाङ्म‌य पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

इतर पुरस्कारांमध्ये ‘महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय’ या ग्रंथासाठी नामदेव कांबळे हे कुसुमानिल स्मृती समीक्षा पुरस्काराचे मानकरी ठरले असून, ‘वैद्यकशास्त्रातील कालवेध’या पुस्तकासाठी डाॅ. प्रमोद कोलवाडकर यांना य. खु. देशपांडे स्मृती शास्त्रीय लेखन पुरस्कार दिला जाईल. इतर पुरस्कारांमध्ये मनोज सुरेंद्र पाठक यांना शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृती काव्यलेखन तर वा. ना. देशपांडे स्मृती ललितलेखन पुरस्कार रवींद्र जवादे यांना घोषित झाला आहे. गजानन फुसे व डॉ. विजय राऊत यांना नवोदित साहित्य लेखन पुरस्कार घोषित झाले आहे. ज्येष्ठ कथाकार स्व. के. ज. पुरोहित उपाख्य शांताराम यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा या वर्षीच्या दिवाळी अंकातील सर्वोत्कृष्ट कथेचा शांताराम कथा पुरस्कार पुरस्कार ‘संवादसेतू’ या दिवाळी अंकातील ‘निर्णय’ या कथेसाठी डॉ. शुभंकर कुलकर्णी यांना घोषित झाला असून, नितीन नायगावकर यांना हरिकिसन अग्रवाल स्मृती अग्रवाल स्मृती पत्रकारिता पुरस्कार देण्यात येईल. कविवर्य ग्रेस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘युगवाणी’ नियतकालिकातील सर्वोत्कृष्ट लेखासाठी दिला जाणारा पुरस्कार यंदा सुधीर पटवर्धन यांची संजय गणोरकर यांनी घेतलेल्या वैशिष्ट्यपूर्ण मुलाखतीसाठी जाहीर झाला आहे. ‘कवी अनिल यांची संपूर्ण कविता’ या ग्रंथासाठी श्याम माधव धोंड यांना उत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार घोषित करण्यात आला. उल्हास साबळे आणि विलास जोशी यांना ‘नक्षत्रगाथा’ विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला असून, विदर्भ साहित्य संघाचा उत्कृष्ट शाखा पुरस्कार वर्धा शाखेला जाहीर झाला आहे. १४ जानेवारी २०२१ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या ९८ व्या वर्धापन दिनी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती वि.सा.संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांनी दिली.

Web Title: Literary award of Vidarbha Sahitya Sangh announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.