वानाडोंगरी परिसरात बिबट शिरला? ट्रॅप कॅमेरे लावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 09:44 PM2020-10-03T21:44:17+5:302020-10-03T21:45:21+5:30

Leopard, Wanadongri वानाडोंगरी (ता. हिंगणा) येथील आयटीआय परिसरात बिबट शिरल्याची वार्ता सर्वत्र पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्यासोबतच वन अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. या बिबट्याला कुणीही प्रत्यक्ष बघितले नसताना या भागात बघ्यांनी शनिवारी (दि. ३) सायंकाळी गर्दी केली होती.

Leopard in the Wanadongri area? Trap cameras installed | वानाडोंगरी परिसरात बिबट शिरला? ट्रॅप कॅमेरे लावले

वानाडोंगरी परिसरात बिबट शिरला? ट्रॅप कॅमेरे लावले

Next
ठळक मुद्देकुणाच्याही नजरेत पडला नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर  (हिंगणा ): वानाडोंगरी (ता. हिंगणा) येथील आयटीआय परिसरात बिबट शिरल्याची वार्ता सर्वत्र पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्यासोबतच वन अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. या बिबट्याला कुणीही प्रत्यक्ष बघितले नसताना या भागात बघ्यांनी शनिवारी (दि. ३) सायंकाळी गर्दी केली होती.
शेतातून घरी परत येत असलेल्या काही महिलांना सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बिबट दिसल्याची वार्ता सर्वत्र पसरली. हा बिबट नेमका कुणाला दिसला, हे मात्र कळू शकले नाही. माहिती मिळताच माजी सरपंच सतीश शहाकार यांनी पहिल्यांदा या भागाची पाहणी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी आशीष निनावे, क्षेत्र सहायक यू. बी. भामकर, एन. एन. केंद्रे व वनरक्षक टी. एस. केंद्रे यांनी तातडीने हा परिसर गाठून बिबट्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्याला पळवून लावण्यासाठी फटाकेही फोडले. परंतु, त्याने कुणालाही दर्शन दिले नाही. आयटीआयच्या परिसरात झाडेझुडपे असून, नागरी वस्तीही आहे. अंधारामुळे त्याचा शोध घेण्यास अडचणी निर्माण होत असल्याने वन अधिकाऱ्यांनी या भागात चार ‘ट्रॅप कॅमेरे’ लावले आहेत. दुसरीकडे, नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले

Web Title: Leopard in the Wanadongri area? Trap cameras installed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.