मनीषनगर आरओबी बॉस्ट्रिंग स्टील गर्डरचे लॉन्चिंग पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:46 AM2020-09-27T00:46:38+5:302020-09-27T00:47:38+5:30

तांत्रिकदृष्ट्या अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजले जाणारे मनीषनगर आरओबीचे (रेल्वे ओव्हर ब्रिज) काम महामेट्रोने शनिवार मध्यरात्री चार तास रेल्वे सेवा थांबवून कार्य पूर्ण केले. एवढ्या कमी वेळेकरिता ब्लॉक घेण्याचा हा नागपुरातला पहिलाच प्रसंग आहे.

Launch of Manishnagar ROB Bostring Steel Girder Completed | मनीषनगर आरओबी बॉस्ट्रिंग स्टील गर्डरचे लॉन्चिंग पूर्ण

मनीषनगर आरओबी बॉस्ट्रिंग स्टील गर्डरचे लॉन्चिंग पूर्ण

Next
ठळक मुद्देचार तास रेल्वे सेवा थांबविली : ऑक्टोबरपासून आरओबी व आरयूबी खुला होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तांत्रिकदृष्ट्या अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजले जाणारे मनीषनगर आरओबीचे (रेल्वे ओव्हर ब्रिज) काम महामेट्रोने शनिवार मध्यरात्री चार तास रेल्वे सेवा थांबवून कार्य पूर्ण केले. एवढ्या कमी वेळेकरिता ब्लॉक घेण्याचा हा नागपुरातला पहिलाच प्रसंग आहे. यापूर्वी खापरी येथे उड्डाणपुलाच्या बांधकामात अशाच प्रकारे रेल्वे ब्लॉक घेतला होता. याकरिता भारतीय रेल्वेने सहकार्य केले. यामुळे ऑक्टोबर २०२० पासून आरओबी व आरयूबी नागरिकांकरिता खुला होणार आहे.
मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगवरून मार्ग तयार करण्याकरिता एकूण ६४.३८ मीटर लांब गर्डरची आवश्यकता होती. त्यापैकी १९ मीटरचे कार्य महामेट्रोने आधीच पूर्ण केले होते. उर्वरित ४५ मीटर लांब बॉस्टिंग स्टील गर्डरचे लान्चिंग यशस्वीरीत्या पूर्ण गेले. या आरओबीची लांबी ४३. ४८ मीटर व रुंदी १२.६ मीटर आहे. आरओबीसोबत दोन्ही बाजूने प्रत्येकी १.५ मीटर पायी चालण्याकरिता फुटपाथची व्यवस्था आहे. ३६० टन क्षमतेचे स्टील गर्डर ई-३५० ग्रेडचे असून आरडीएसओच्या मानकानुसार तयार करण्यात आले. गर्डरला आधार देण्याकरिता खालून अंदाजे ४५०-५०० टन स्टीलचा उपयोग करण्यात आला. यामुळे रेल्वे रुळावर मनीषनगर परिसर आणि वर्धा मार्गावरील उज्ज्वलनगर हे दोन मार्ग एकमेकांना जोडल्या गेले. मुख्य म्हणजे आरओबीचे कार्य पूर्ण झाल्याने हा पूल आता वर्धा मार्गावरील तीनस्तरीय प्रणालीला (रस्ता, डबल डेकर उड्डाणपूल व मेट्रो मार्ग) हा आरओबी आता जोडला जाणार आहे. या कामाकरिता महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी मेट्रो कामगार तसेच अधिकाऱ्यांचे कौतुक केले आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. महामेट्रोने जमिनी मार्गावरून ५०० मीटर लांब आरयूबी तयार केला असून ६४.३८ मीटर लांब आरओबीचे कार्य पूर्ण केले आहे.
याकरिता भारतीय रेल्वेचे मुख्य पूल अभियंता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (मध्य रेल्वे) अतिरिक्त विभागीय रेल्वे प्रबंधक (इन्फ्रा - मध्य रेल्वे), अतिरिक्त विभागीय रेल्वे प्रबंधक (ऑपरेटिंग-मध्य रेल्वे), वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक, वरिष्ठ विभागीय अभियंता, वरिष्ठ विभागीय अभियंता (मध्य) यांनी सहकार्य केले.

Web Title: Launch of Manishnagar ROB Bostring Steel Girder Completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.