लाेखंडी पाइप चाेरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:09 AM2021-04-14T04:09:05+5:302021-04-14T04:09:05+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क गाेंडखैरी : पाणीपुरवठा याेजनेचे लाेखंडी पाइप चाेरून नेत असलेल्या दाेन चाेरट्यांना कळमेश्वर पाेलिसांनी पाठलाग करून अटक ...

Lakhandi pipe thieves arrested | लाेखंडी पाइप चाेरट्यांना अटक

लाेखंडी पाइप चाेरट्यांना अटक

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

गाेंडखैरी : पाणीपुरवठा याेजनेचे लाेखंडी पाइप चाेरून नेत असलेल्या दाेन चाेरट्यांना कळमेश्वर पाेलिसांनी पाठलाग करून अटक केली. ही कारवाई गाेंडखैरी- हिंगणा मार्गावर मंगळवारी (दि. १३) दुपारी १.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली.

मुकेश सुभाष पाल, रा. राजुरा (बाजार), ता. वरूड, जिल्हा अमरावती व अशोक केदारनाथ पाल, रा. नौवादाढी, ता. मछलीशहर, जिल्हा जौनपूर (उत्तर प्रदेश), अशी अटक करण्यात आलेल्या चाेरट्यांची नावे आहेत. नीलडोह-डिगडोह (ता. हिंगणा) ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा याेजनेचे काम दाेन वर्षांपासून सुरू असून, पाण्याची उचल वेणा जलाशयातून केली जाणार आहे. या परिसरात पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून, त्यासाठी लाेखंडी पाइप वापरले जात आहेत. हे कंत्राट एम. एम. होळंबे कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहेत. कंपनीने या लाेखंडी पाइपचा साठा गाेंडखैरी (ता. कळमेश्वर) परिसरातील हिंगणा टी पाॅइंटजवळ केला आहे.

या दाेघांनीही एमएच-४०/बीजे-६६९६ क्रमांकाच्या हायड्राने एमएच-४९/११८० क्रमांकाच्या ट्रकमध्ये टाकायला सुरुवात केली. ते लाेखंडी पाइप चाेरून नेत असल्याचे लक्षात येताच कुणीतरी पाेलिसांना माहिती दिली. पाेलिसांचे पथक घटनास्थळी दाखल हाेईपर्यंत त्यांनी तिथून वाहनासह हिंगण्याच्या दिशेने पळ काढला हाेता. त्यामुळे पाेलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. यात त्यांच्याकडून १० लाख रुपयांचा ट्रक, त्यातील चार लाख रुपये किमतीचे आठ नग लाेखंडी पाइप, १५ लाख रुपयांची हायड्रा व इतर साहित्य, असा एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Lakhandi pipe thieves arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.