खासदार सांस्कृतिक महोत्सव; वाडकरांच्या कन्येचा ‘रियाज’ अन् वाद्यवृंदांची ‘काटकसर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 10:53 AM2019-12-03T10:53:32+5:302019-12-03T10:54:03+5:30

तिसऱ्या खासदार महोत्सवात रविवारी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात सादर झालेल्या प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या ‘सूरमयी शाम’ या कार्यक्रमाने रसिकांची घोर निराशा केल्याचे दिसून येते.

Khasdar Cultural Festival; practice for 'daughter of Vadkar and' cut off in orchestras | खासदार सांस्कृतिक महोत्सव; वाडकरांच्या कन्येचा ‘रियाज’ अन् वाद्यवृंदांची ‘काटकसर’

खासदार सांस्कृतिक महोत्सव; वाडकरांच्या कन्येचा ‘रियाज’ अन् वाद्यवृंदांची ‘काटकसर’

googlenewsNext
ठळक मुद्देमहोत्सवाचा दर्जा घसरणार नाही का?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संगीतामुळे मेंदूला चैतन्य प्राप्त होते आणि तणावातून मुक्ती झाल्याने पुढच्या कामासाठीची स्फूर्ती मिळते. खासदार सांस्कृतिक महोत्सवातून नागपूरकर रसिकांना अशीच स्फूर्ती मिळत असते. खासदार सांस्कृतिक महोत्सवात सादरीकरण करण्यासाठी येणारे कलावंत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले आहेत. मागील दोन वर्षांत महोत्सवाने ही दर्जेदार परंपरा सांभाळली आहे. मात्र, तिसऱ्या खासदार महोत्सवात रविवारी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात सादर झालेल्या प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या ‘सूरमयी शाम’ या कार्यक्रमाने रसिकांची घोर निराशा केल्याचे दिसून येते. वाडकरांसोबतच वाडकर कन्या अनन्याचा अपुरा रियाज आणि वाद्यवृंदांमध्ये केलेल्या काटकसरीने रसिकांनी वाडकरांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून महोत्सवात प्रख्यात कलावंतांसोबतच स्थानिक कलावंतही तोच दर्जा सांभाळत असल्याचे दिसूनही आले आहे. रविवारी महोत्सवात ‘सूरमयी शाम’ सादर करण्यासाठी आलेले प्रख्यात पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी त्यांच्या गायनाने सर्वांना जिंकले. परंतु, त्यांची कन्या अनन्या ही अजूनही गायकीचे प्राथमिक धडे घेत असल्याचे लक्षात आले. अनन्याला हतोत्साहित करण्याचा हा हेतू नाही. मात्र, वाडकर जर लाखो रुपये मानधन घेऊन महोत्सवात कार्यक्रम सादर करत असतील तर त्यांनी सोबत येणारे कलावंतही तेवढेच दर्जेदार व तयारीचे असणे गरजेचे आहे.
अनन्याने सादर केलेले ‘मोह मोह के धागे’ हे गीत तर लहान मुलेदेखील छान गातात. केवळ वाडकरांची मुलगी आहे म्हणून श्रोत्यांनी ते सहन करायचे का? अनन्याची तयारी नसल्याचे पदोपदी जाणवत होते. तत्पूर्वी दोघांनीही सादर केलेले युगलगीत ‘मेघा रे मेघा रे’दरम्यान अनन्याचा घसरलेला स्वर सांभाळण्यासाठी खुद्द सुरेश वाडकरांनाच स्वत:चा माईक तिच्यापुढे धरावा लागला. माईक पकडण्याचे तंत्रही तिला अवगत नसल्याचे दिसून येत होते. तिला गायनासाठी उभे करण्यापूर्वी तिच्याकडून व्यवस्थित रियाज करवून घेणे गरजेचे होते.
एखादी सामान्य कुटुंबातील अशाच गाणाºया मुलीला वाडकरांनी हे व्यासपीठ दिले असते का? खासगी मैफिलीमध्ये हे असे कौतुक समजून घेता येईल.
संगीत ही साधना आहे आणि निसर्गाची देणगीही आहे. त्यामुळे वाडकरांसारख्या प्रथितयश गायकाच्या लक्षात अशा गोष्टी आणून देणे आवश्यक ठरते आणि नागपूरचे श्रोते ‘हलक्या’ कानाचे नाहीत, हे त्यांना सांगणे क्रमप्राप्त ठरते. या कार्यक्रमात पुरेसे संगीत वाद्यही नव्हते.
कदाचित मिळालेल्या मानधनातील नफा वाढविण्यासाठी वाडकरांनी ही काटकसर केली असावी, असे श्रोतृवृंदात बोलले जात होते. एकप्रकारे वाडकरांनी नागपूरकर रसिकांची फसवणूक केल्याचा आरोपही दबक्या आवाजात केला जात होता.
संगीताचा वारसा लादता येत नाही
शैक्षणिक, उद्योग, राजकीय क्षेत्रात असा वारसा खपून जातो. कला आणि संगीताच्या क्षेत्रात असा वारसा लादता येत नाही. अनेक कलावंतांनी असा वारसा लादण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते सपशेल अपयशी ठरले, हे वाडकरांनी ध्यानात घ्यावे. आयोजकांनीसुद्धा असे कार्यक्रम ठरविताना कलावंत मानधनासाठी जशी घासाघीस करतो, तसेच त्यांनी कार्यक्रमाचा दर्जा उत्तम राहील, अशी घासाघीस करणे अभिप्रेत आहे. अन्यथा असली फसवणूक होणार नाही, जशी रविवारी नागपूरकरांची झाली.

Web Title: Khasdar Cultural Festival; practice for 'daughter of Vadkar and' cut off in orchestras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.