कन्हानमधून बोगद्याद्वारे १० टीएमसी पाणी तोतलाडोह जलाशयात वळवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 10:25 PM2019-09-17T22:25:34+5:302019-09-17T22:31:16+5:30

पाणीटंचाईची कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जलसंपदा विभागातर्फे मध्यप्रदेशातील लोहघोगरी गावाजवळून कन्हान नदीतून बोगद्याद्वारे १० टीएमसी पाणी तोतलाडोह जलाशयात वळवण्याच्या २८६४ कोटीच्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली.

From Kanahan, a tunnel will divert 2 TMC water to Totladoh reservoir | कन्हानमधून बोगद्याद्वारे १० टीएमसी पाणी तोतलाडोह जलाशयात वळवणार

कन्हानमधून बोगद्याद्वारे १० टीएमसी पाणी तोतलाडोह जलाशयात वळवणार

Next
ठळक मुद्देशासन परिपत्रकामुळे निर्णयावर शिक्कामोर्तबमुख्यमंत्री फडणवीस यांचा सकारात्मक निर्णयपालकमंत्री बावनकुळे व आमदारांच्या प्रयत्नांना यशचौराई धरणामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई दूर होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे महाराष्ट्रातील पेंच प्रकल्पातील जलसाठ्यावर परिणाम झाल्याने नागपूर शहरात उन्हाळ्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली होती. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जलसंपदा विभागातर्फे मध्यप्रदेशातील लोहघोगरी गावाजवळून कन्हान नदीतून बोगद्याद्वारे १० टीएमसी पाणी तोतलाडोह जलाशयात वळवण्याच्या २८६४ कोटीच्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली होती. त्यासंदर्भातील शासकीय परिपत्रक शासनाने मंगळवारी जारी करून या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
भंडारा-नागपूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा निर्णय आहे. तसेच नागपूर शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. नागपूरच्या इतिहासात राज्य शासनाने घेतलेला हा एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय आहे. एवढा मोठा निर्णय यापूर्वी झाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर, भंडारा परिसरातील शेतकऱ्यांची व नागरिकांची मागणी व भावना लक्षात घेता सकारात्मक भूमिका घेऊन या निर्णयाला मान्यता दिली.
दरम्यान शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊ न पाणीटंचाईबाबत व सिंचनाबद्दल चिंता व्यक्त केली होती. गडकरी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याची सूचना केली होती. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व या भागातील आमदारांनी दीर्घकाळापासून पाणीटंचाई व सिंचनावर तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली होती. चौराई धोरणामुळे पेंच नदीवरील तोतलाडोह धरणात येणारे पाणी येणे कमी झाले आहे. सन २०१६-१७ मध्ये चौराई बांधण्यात आले. तेव्हापासून नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना पाणी मिळेनासे झाले व नागपूर शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती.
चौराई धरणामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या ६१४ दलघमी पाण्यात घट झाली. १९६४ च्या पाणी वापरासाठी करण्यात आलेल्या आंतरराज्यीय पाणीवापर करारानुसार मागील ४० वर्षात महराष्ट्राला १८४० दलघमी पाणी मिळवयास हवे होते. ते फक्त १२९४ दलघमी मिळाले. चौराई धरण होईपर्यंत गेल्या २५ वषार्पासून नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणात येणाऱ्या सर्व पाण्याचा वापर होत होता. त्यातून नागपूर शहरासाठी पाणीपुरवठा योजना व सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. पण आता त्यात ६१४ दशलक्ष घनमीटरची तूट निर्माण झाली आहे.

Web Title: From Kanahan, a tunnel will divert 2 TMC water to Totladoh reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.