नागपुरातील पोलीस नायक कैलास पारधी कॅनडात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 08:31 PM2020-02-28T20:31:40+5:302020-02-28T20:32:51+5:30

पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले नायक पोलीस कॉन्स्टेबल कैलास पारधी यांची कॅनडा टोरँटो अ‍ॅथलेटिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Kailash Pardhi, a police nayak from Nagpur, will go to Canada | नागपुरातील पोलीस नायक कैलास पारधी कॅनडात जाणार

नागपुरातील पोलीस नायक कैलास पारधी कॅनडात जाणार

googlenewsNext
ठळक मुद्देमणिपूरचा अडथळा पार : आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले नायक पोलीस कॉन्स्टेबल कैलास पारधी यांची कॅनडा टोरँटो अ‍ॅथलेटिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मणिपूर इंफाळ येथे नुकत्याच झालेल्या ४०० मीटर अडथळ्याच्या स्पर्धेत त्यांनी रजत पदक प्राप्त केले आहे. येथेच त्यांची टोरँटो अ‍ॅथलेटिकसाठी निवड घोषित झाली.
९ ते १४ फेब्रुवारी २०२० दरम्यान ४१ वी मास्टर अ‍ॅथलेटिक स्पर्धा इंफाळ येथे संपन्न झाली. यात नागपूर शहर पोलीस दलाचे नेतृत्व करणारे पारधी यांनी ४०० मीटर अडथळ्याच्या स्पर्धेत रजत पदक मिळवले. तत्पूर्वी सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पारधी यांनी १००, २०० आणि ४०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. येथील खासदार चषक स्पर्धेत १०० मीटरमध्ये रजत तर २०० मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवून त्यांनी शहर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. इंफाळमधील स्पर्धेने पारधींच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या मार्गात असलेला अडथळा दूर केला. २० ते २८ जुलै २०२० दरम्यान टोरॅन्टोमध्ये ही स्पर्धा होणार आहे. पारधी यांच्या या यशाबद्दल त्यांचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केले. पारधी यांनी आपल्या यशाचे श्रेय मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांना दिले आहे.

Web Title: Kailash Pardhi, a police nayak from Nagpur, will go to Canada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.