लता मंगेशकर यांना जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 07:23 PM2021-09-27T19:23:48+5:302021-09-27T19:24:23+5:30

नागपूर-पुणे येथील छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

Jijamata Scholarship Award announced to Lata Mangeshkar | लता मंगेशकर यांना जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार जाहीर

लता मंगेशकर यांना जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार जाहीर

googlenewsNext

नागपूर : नागपूर-पुणे येथील छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

धर्म, संस्कृती, इतिहास आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यास प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या ४० वर्षांपासून या पुरस्काराने गौरविण्यात येतो. रोख रक्कम १ लाख ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लता मंगेशकर यांच्या ९३व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार लता मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम जाहीररीत्या करण्यात येणार नसल्याची माहिती छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक शिवकथाकार विजयराव देशमुख उपाख्य सद्गुरुदास महाराज, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय देशमुख, सचिव भालचंद्र देशकर यांनी पत्रपरिषदेत दिली. यापूर्वी हा पुरस्कार चित्रमहर्षी भालजी पेंढारकर, पद्मश्री हृदयनाथ मंगेशकर, सेतूमाधवराव पगडी, गो.नी. दांडेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस, धुंडा महाराज देगलुरकर, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पं. महादेवशास्त्री जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. रामचंद्र देखणे यांच्यासह ३८ मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे.

................

Web Title: Jijamata Scholarship Award announced to Lata Mangeshkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.