नागपुरात हजारो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या झामची झाडाझडती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:18 AM2019-09-16T11:18:06+5:302019-09-16T11:18:28+5:30

हजारो नागरिकांची आयुष्यभराची कमाई गिळंकृत करून त्यांना आयुष्यातून उठविणारा कुख्यात बिल्डर हेमंत सिकंदर झाम (वय ३५) याला अटक केल्याच्या काही तासानंतर पोलिसांनी त्याचा एक साथीदार यौवन जीवनदास गंभीर याच्याही मुसक्या बांधल्या.

Inquiry of Zaam who cheated Thousands of citizens in Nagpur | नागपुरात हजारो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या झामची झाडाझडती सुरू

नागपुरात हजारो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या झामची झाडाझडती सुरू

Next
ठळक मुद्देसाथीदारालाही अटक, १९ पर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हजारो नागरिकांची आयुष्यभराची कमाई गिळंकृत करून त्यांना आयुष्यातून उठविणारा कुख्यात बिल्डर हेमंत सिकंदर झाम (वय ३५) याला अटक केल्याच्या काही तासानंतर पोलिसांनी त्याचा एक साथीदार यौवन जीवनदास गंभीर याच्याही मुसक्या बांधल्या. या दोघांना आज न्यायालयात हजर करून, त्यांची १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळवली.
गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फिरणारा कुख्यात हेमंत झाम याला गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सकाळी सोनेगावातील एका आलिशान सदनिकेतून नाट्यमयरीत्या अटक केली होती. कुख्यात झामला बेड्या ठोकल्यानंतर त्याचा साथीदार यौवन गंभीर यालाही काही तासानंतर पोलिसांनी अटक केली. या दोघांना गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाच्या तपास पथकाने न्यायालयात हजर केले. त्यांच्या कुकृत्याची जंत्री न्यायालयात मांडून, त्यांची १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळवली.
हेमंत झाम आणि त्याच्या नातेवाईक तसेच साथीदारांनी २०११ वागदरातील विस्तीर्ण परिसरात कन्हैया सिटी उभारण्याची जाहिरात करून नागरिकांना स्वस्तात सर्व सुविधांयुक्त घरे देण्याचे स्वप्न दाखवले होते. हजारो नागरिकांनी हेमंत झामकडे आपली आयुष्यभराची कमाई सोपवली. त्यांची रक्कम गिळंकृत करणाºया झामने गाशा गुंडाळल्याचे पाहून, ४०० जणांनी त्याच्याविरुद्ध ग्राहक मंचात तक्रार नोंदविली होती. त्यावरून ग्राहक मंचाने त्याला हजर राहण्यासाठी २६० समन्स/वॉरंट काढले होते. मात्र, तो तेथे हजरच राहत नव्हता. सोनेगावात गुन्हा दाखल झाल्यानंतर जामीन मिळवून हेमंत झाम त्याचे नातेवाईक आणि साथीदारांसह फरार झाला. आयुष्यभराची रक्कम गमविणारे गुंतवणूकदार झामच्या नावाने आक्रोश करीत होते. पोलीस झाम आणि त्याच्या साथीदारांचा दोन वर्षांपासून इकडे-तिकडे शोध घेत होते आणि झाम दीड ते दोन कोटी रुपयांच्या आलिशान सदनिकेत ऐशोआरामात जगत होता. त्याने प्रेमविवाहही केला होता अन् तो पत्नीसोबत दिल्ली-मुंबईच्या विमानवाºयाही करीत होता.
पीडित गुंतवणूकदारांनी झामसोबत काही पोलिसांचे संगनमत असल्याचे सांगून, त्याला अटक करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप करणारी तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे केली. त्याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी झाम याला तातडीने अटक करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते. आयुक्तांचे निर्देश अनेक पोलीस अधिकाºयांनी प्रतिष्ठेचा विषय बनविला होता. या पार्श्वभूमीवर, गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने त्याच्या मुसक्या बांधण्यात शनिवारी यश मिळवले. त्यानंतर त्याच्या साथीदारालाही पकडले. या दोघांना आर्थिक विभागाच्या पथकाकडे सोपविण्यात आले. तेव्हापासून झाम आणि साथीदार गंभीरच्या सदनिकेची झाडाझडती पोलीस घेत आहेत. पुढच्या काही तासांत यासंबंधाने मोठे काही हाती लागेल, अशी पोलिसांना अपेक्षा आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे आणि पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत माने हा तपास करीत आहेत.

झाम-धवडचे संगनमत जाहीर
हजारो नागरिकांची रक्कम हडपून त्यांना हवालदिल करणाऱ्या हेमंत झाम याचे नवोदय बँकेचे अध्यक्ष अशोक धवड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नाईक यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचे पोलिसांनी आज जाहीर केले आहे. झामचे आधीचे कोट्यवधीचे कर्ज थकीत असताना त्याला धवड आणि नाईकने पुन्हा २ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज दिले होते. कर्ज देताना धवड-नाईकने झामसोबत एक बैठक घेतली होती आणि बैठकीनंतर एका साध्या कागदावर कोट्यवधीच्या कर्जाचा करार केला होता. हा धनादेश झामने पंजाब नॅशनल बँकेतून वटविल्यानंतर त्या रकमेचा लाभ कुणाला दिला, ते आता पोलीस त्याच्याकडून वदवून घेणार आहेत.

Web Title: Inquiry of Zaam who cheated Thousands of citizens in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.