तडकासह नागपुरातील चार रेस्टॉरंटचे अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 01:03 AM2020-03-18T01:03:43+5:302020-03-18T01:04:21+5:30

महापालिकेच्या धरमपेठ झोन क्षेत्रातील वैद्य भवन येथील तडका रेस्टॉरंटसह चार रेस्टॉरंटच्या अतिक्रमणांवर मंगळवारी अतिक्रमण निर्मूलन पथकाने हातोडा चालविला.

Including Tadaka four restaurants encroachment was removed in Nagpur | तडकासह नागपुरातील चार रेस्टॉरंटचे अतिक्रमण हटविले

तडकासह नागपुरातील चार रेस्टॉरंटचे अतिक्रमण हटविले

Next
ठळक मुद्देधरमपेठ झोनची कारवाई : बड्या अतिक्रमणांवर हातोडा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या धरमपेठ झोन क्षेत्रातील वैद्य भवन येथील तडका रेस्टॉरंटसह चार रेस्टॉरंटच्या अतिक्रमणांवर मंगळवारी अतिक्रमण निर्मूलन पथकाने हातोडा चालविला. रेस्टॉरंटच्या पार्किंग जागेतील ठेले, किचन शेड व टिन शेड जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले.
ट्राफिक चिल्ड्रेन पार्कजवळील भगवाघर ले-आऊ ट मधील प्लॉट क्रमांक ७, वैद्य भवन येथील तडका रेस्टॉरंट व कॅफे तसेच सॅन्डविच कारखान्याच्या पार्किगच्या जागेत अतिक्रमण करण्यात आले होते. झोन कार्यालयाने नोटीस बजावल्यानंतरही अतिक्रमण न हटविल्याने पथकाने कारवाई केली.
प्लाट क्रमांक २, पारधी निवास येथील पास्ता फे स्का या रेस्टॉरंटच्या पार्किंगमधील शेड तोडण्यात आले. प्लॉट क्रमांक ३ येथील अपटाऊ न कॅफे कोर्टयार्ड यांच्याकडून ५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच फिरंगीश कॅफे, सदर्न फूड स्ट्रीट, सीटी सीएस ,एसएफएस, सिटी आॅफ स्पाईस येथील पार्किंगच्या जागेत करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात आले.
धरमपेठ झोनमधील अतिक्रमण निर्मूलन पथक, उपद्रव शोध पथक, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता आदींनी जेसीबी, टिप्परच्या साहाय्याने अतिक्रमण हटविले.

धार्मिक स्थळ हटविण्यावरून तणाव
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथक मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास महाल झोनमधील चिटणवीस पार्क लगतचे एक धार्मिक स्थळ हटवित असताना या कारवाईला लोकांनी विरोध केल्याने काहीवेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ही जागा लीजवर असल्याचे धार्मिक स्थळाशी संबंधित लोकांचे म्हणणे होते. त्यामुळे कागदपत्रे सादर कण्यासाठी तीन दिवसांची मुदत देऊन तूर्त कारवाई थाबंविण्यात आली. त्यानंतर पथकाने टिमकी के तीन खंबा येथील एक धार्मिक स्थळ तोडले. गंगाबाई घाट येथील सिवर लाइनवर केलेले अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. यावेळी चार घरांच्या भिंती व एक शौचालय तोडण्यात आले. नेहरूनगर झोन क्षेत्रातील टिनाचे कंपाऊं ड हटविण्यात आले. दुसऱ्या पथकाने इतवारी येथे कुख्यात गुंंड संतोष आंबेकर याचे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू ठेवली.

Web Title: Including Tadaka four restaurants encroachment was removed in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.