सरकारच्या निर्देशानुसारच मी सीईओ! नागपूरचे आयुक्त मुंढे यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 01:44 AM2020-07-02T01:44:08+5:302020-07-02T01:44:31+5:30

स्मार्ट सिटी प्रकल्पावरून भाजपने मुंढे यांच्यावर आरोप केले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंढे यांची केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे.

I am the CEO as per the instructions of the government! Nagpur Commissioner Mundhe's explanation | सरकारच्या निर्देशानुसारच मी सीईओ! नागपूरचे आयुक्त मुंढे यांचे स्पष्टीकरण

सरकारच्या निर्देशानुसारच मी सीईओ! नागपूरचे आयुक्त मुंढे यांचे स्पष्टीकरण

Next

नागपूर : मनपा आयुक्त म्हणून मी २८ जानेवारी २०२० रोजी रुजू झालो. मनपा आयुक्त हे स्मार्ट सिटीचे (एसपीव्ही) पदसिद्ध संचालक आहेत. रामनाथ सोनावणे हे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून कार्यरत होते. त्यांनी ११ फेब्रुवारी २०२० रोजी या पदाचा राजीनामा स्मार्ट सिटीचे चेअरमन प्रवीणसिंह परदेशी यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांनी मला मोबाईलवर दिलेल्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार मी सीईओ पदाचा कार्यभार सांभाळत असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पावरून भाजपने मुंढे यांच्यावर आरोप केले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंढे यांची केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे. यावर खुलासा करताना मुंढे यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा कार्यभार सांभाळताना सदर कालावधीत ट्रान्सफर स्टेशनचे टेंडर रद्द करून बायो मायनिंगचे टेंडर जाहीर केले होते. ते चेअरमन यांच्याशी चर्चा करूनच केलेले आहे.

 

Web Title: I am the CEO as per the instructions of the government! Nagpur Commissioner Mundhe's explanation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.