Homeless hit Nagpur NMC | बेघर झालेल्यांची नागपूर मनपावर धडक
बेघर झालेल्यांची नागपूर मनपावर धडक

ठळक मुद्देपुनर्वसन करण्याची मागणी : न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर नागपुरातील २० वर्षापूर्वी वसलेल्या झोपडपट्टीधारकांची घरे तोडल्याने बेघर झालेल्या नागरिकांनी शनिवारी सिव्हील लाईन येथील महापालिका मुख्यालयावर धडक दिली. बेघर झालेल्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली.
महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसच्या उपाध्यक्ष नगरसेविका नेहा राकेश निकोसे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी शेळके आदींच्या नेतृत्वात महापालिका मुख्यालयापुढे नारेबाजी करून आयुकत अभिजित बांगर यांच्याशी चर्चा केली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील हायटेन्शन लाईन लगतची घरे तोडली जात आहे. परंतु २००० सालापूर्वी वसलेल्या झोपडपट्ट्यांना कायद्याने संरक्षण दिले असतानाही अशा झोपडपट्टीत्ील नागरिकांचे पुनर्वसन न करताच त्यांची घरे तोडली जात आहे. याची दखल घेत न्यायालयाने आपल्या आदेशाला ४५ दिवस स्थगिती दिली. असे असतानाही महापालिकेतर्फे कारवाई सुरू आहे. या विरोधात नारेबाजी करण्यात आली. पीडितांना न्याय न मिळाल्यास यासंदर्भात न्यायालयात जाण्याचा इशारा युवक काँग्रेसच्या नेत्यांनी दिला.
आंदोलनात शहर युवक काँग्रेस अध्यक्ष तौसिफ खान, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव मोइज शेख, उत्तर नागपूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनमोल लोणारे, शहर सचिव राकेश निकोसे, महासचिव बाबू खान, मध्य नागपूर युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील ढोके, पश्चिम नागपूर युवक काँग्रेस अध्यक्ष अखिलेश राजन, प्रदेश युवक काँग्रेसचे महासचीव अक्षय घाटोळे, दक्षिण पश्चिम युवक काँग्रेस अध्यक्ष मंगेश बढेल, युवक काँग्रेस अल्पसंख्यक शहर अध्यक्ष वसीम शेख, इरफान काजी, राज बोकडे, प्रदेश सचिव धीरज धकाते, जावेद शेख,मोइज शेख, प्यारे अहमद , जुनैद शेख, काजल लांजेवार, शोभा गजभीये, चंद्र कुमार, लक्ष्मी देवेंद्र, राजीव अपन, पूजा सिंह, करुणा सया यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Homeless hit Nagpur NMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.