विदर्भवाद्यांनी केली वीज बिलाची होळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 09:32 PM2019-08-01T21:32:32+5:302019-08-01T21:34:02+5:30

विदर्भात विजेचे दर निम्मे करण्यात यावे आणि कृषीपंपाचे बिल माफ करावे, या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी गुरुवारी महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शने करीत वीज बिलाची होळी केली. या दरम्यान विदर्भवाद्यांनी बंद गेट उघडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. गोंधळ वाढल्याने प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारले.

Holi of electricity bill by Vidarbhists | विदर्भवाद्यांनी केली वीज बिलाची होळी 

विदर्भवाद्यांनी केली वीज बिलाची होळी 

googlenewsNext
ठळक मुद्देविजेचे दर निम्मे करा, कृषीपंपाचे बिल माफ करा : विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात विजेचे दर निम्मे करण्यात यावे आणि कृषीपंपाचे बिल माफ करावे, या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी गुरुवारी महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शने करीत वीजबिलाची होळी केली. या दरम्यान विदर्भवाद्यांनी बंद गेट उघडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. गोंधळ वाढल्याने प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात आलेले हे आंदोलन विदर्भातील सर्व जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी झाले. याअंतर्गत नागपुरात काटोल रोडवरील महावितरणच्या कार्यालयासमोर विदर्भवाद्यांनी निदर्शने केली. विजेचे दर निम्मे करण्यात यावे, या मुख्य मागणीसह वीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनी एसएनडीएल बरखास्त करण्यात यावी, मीटर शुल्क, स्थिर भाडे, स्थिर आकार, वीज वहन कर, भार, अधिभार आदी रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
दिल्लीमध्ये वीज स्वस्त होऊ शकते तर महराष्ट्रात का नाही, असा प्रश्नही यावेळी समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी उपस्थित केला. ९ ऑगस्टपर्यंत मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.
आंदोलनात डॉ. श्रीनिवास खांदेवाले, मुकेश मासुरकर, डॉ. एस. जे. ख्वाजा, विजया धोटे, प्रफुल्ल शेंडे, मंगलमूर्ती सोनकुसरे, अ‍ॅड. नीरज खांदेवाले, रजनी शुक्ला, गणेश शर्मा, अ‍ॅड. आर. जे. बेलेकर, प्रतिभा खापर्डे, रेखा निमजे, मुन्ना महाजन, धर्मराज रेवतकर, राजा भैया, तमीजा शेख आदी उपस्थित होते.

Web Title: Holi of electricity bill by Vidarbhists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.