खेळाडुंना मोठा दिलासा : इन्डोअर स्टेडियम खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 10:47 PM2021-06-12T22:47:46+5:302021-06-12T22:49:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा शुक्रवारी साप्ताहिक आढावा घेतल्यानंतर नागपुरात कमी होत असलेले कोरोना संक्रमण लक्षात घेता शहर ...

Great relief to the players: Indoor stadium open | खेळाडुंना मोठा दिलासा : इन्डोअर स्टेडियम खुले

खेळाडुंना मोठा दिलासा : इन्डोअर स्टेडियम खुले

Next
ठळक मुद्देउद्यापासून आणखी सवलती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा शुक्रवारी साप्ताहिक आढावा घेतल्यानंतर नागपुरात कमी होत असलेले कोरोना संक्रमण लक्षात घेता शहर व जिल्हयातील इन्डोअर स्टेडियम सुरू करण्याला परवानगी दिली आहे. शनिवारी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरासाठी तर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यासाठी याबाबतचे आदेश जारी केले आहे. या निर्णयामुळे खेळाडुंना मोठा दिलासा मिळाला आहे.

नागपूर शहरातील इन्डोअर स्टेडियम सुरू करण्यात यावे, अशी मागणी खेळाडुंनी केली होती. ‘लोकमत’च्या माध्यमातून ही मागणी लावून धरली होती. शुक्रवारच्या बैठकीत यावर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर शनिवारी याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.

राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हयातील पॉझिटिव्हीटी रेट,आॅक्सिजन बेडची उपलब्धता व दैनंदिन रूग्णांची परिस्थिती विचारात घेता सुधाररित सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्हा पहिल्या श्रेणीमध्ये समाविष्ट असला धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. याचा विचार करता अनलॉक चेन टप्प्याटप्प्याने वाढविली जात आहे. दरम्यान ग्रामीण भागासाठी आणखी सवलती जाहीर केल्या आहेत. आधार कार्ड केंद्र, शॉपिंग मॉलमधील रेस्टॉरंटसह इनडोअर गेमलाही परवानगी देण्यात आली आली आहे. १४ जून पासून पुढील आदेशापर्यंत यासाठी मुभा राहतील. ६ जून रोजी काढलेले आदेश कायम आहेत.

हे होणार सुरू

शहर व जिल्ह्यातील इन्डोअर स्टेडियम(सायंकाळी ५ पर्यंत )

- जिल्ह्यातील आधार कार्ड सेंटर(सायंकाळी ५वाजेपर्यत)

-टायपिंग इन्स्टिटयुट,कम्युटर इन्स्टिटयुट आणि आरोग्य कर्मऱ्यासाठी कौशल्य विकास इन्स्टिटयुट(एकावेळी २० विदयार्थी किंवा क्षमतेपेक्षा ५० टक्कयापेक्षा कमी उपस्थितीत प्रशिक्षण)

- शॉपिग मॉलमधील रेस्टाँरंट आणि बार ५० टक्के क्षमतेने रात्री १० पर्यत मुभा,(मॉलमधील बार मात्र सायंकाळी पाचपर्यतच सुरू)

धार्मिक स्थळे, शाळा, जलतरण तलाव तूर्त बंदच

राज्य शासनाने आखून दिलेल्या पाच टप्प्यांत नागपूर पहिल्या निकषात बसत असले तरी करोनाचे पुढील संकट टाळण्यासाठी पूर्ण अनलॉक न करण्याच्या निर्णय ६ जून रोजी घेण्यात आला. धार्मिक स्थळे, शाळा, जलतरण तलाव बंदच राहणार असून इतर सामाजिक कार्यक्रमांमधील उपस्थितीवरही बंधने लावण्यात आली आहेत.

Web Title: Great relief to the players: Indoor stadium open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.