गुंडांची पोलिसांवर दगडफेक : नागपुरातील कपिलनगरात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 12:50 AM2021-05-11T00:50:32+5:302021-05-11T00:51:48+5:30

Goons throw stones at police, crime news भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर गुन्हेगारांनी जोरदार दगडफेक केली. त्यामुळे एक पोलीस कर्मचारी जबर जखमी झाला. आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाइलही फोडला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी ही घटना घडली.

Goons throw stones at police: Tensions in Kapilnagar, Nagpur | गुंडांची पोलिसांवर दगडफेक : नागपुरातील कपिलनगरात तणाव

गुंडांची पोलिसांवर दगडफेक : नागपुरातील कपिलनगरात तणाव

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिस कर्मचाऱ्यांचा मोबाइल फोडला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर गुन्हेगारांनी जोरदार दगडफेक केली. त्यामुळे एक पोलीस कर्मचारी जबर जखमी झाला. आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाइलही फोडला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी ही घटना घडली.

शेंडे नगरात सागर आणि सतीश पाल हे दोन गुन्हेगार राहतात. ते दोघे भाऊ असले तरी त्यांचे आपसात पटत नाही. घरगुती कारणावरून ते एकमेकांना तसेच आजूबाजूच्यांसोबत नेहमीच वाद घालतात. मारहाणही करतात. दोन आठवड्यांपूर्वी सागरने अशाच प्रकारे कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली होती. तक्रार मिळाल्यानंतर कपिलनगर पोलिसांनी त्याला अटक केली आणि दुसऱ्या दिवशी तो जामिनावर बाहेरही आला. रविवारी दुपारी २.४५ वाजता आरोपी प्रफुल्ल ऊर्फ दादू दमाहे आणि सतीश तसेच सागर वाद घालू लागले. त्याची माहिती कळताच पोलीस पथक तेथे पोहोचले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे साथीदार तेथे पोहोचले. आम्ही काय ते बघून घेतो, असे म्हणून आरोपींच्या साथीदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. मोठा गुन्हा होऊ शकतो हे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यामुळे पोलिसांचा विरोध करण्यासाठी आरोपींचे साथीदार कुणाल ऊर्फ कालू पाटील, वैभव ऊर्फ बबलू भैसारे, श्‍याम ऊर्फ छोटू विजय पांडे तसेच अन्य साथीदारांनी पोलिसांना गराडा घातला. सागरला पोलिसांच्या ताब्यातून सोडवून घेण्यासाठी जोरदार दगडफेक केली. यात जयशील नंदेश्वर नामक पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्याला मारहाण करतानाच आरोपींनी त्याचा मोबाइल फोडला. या घटनेची माहिती कळताच आजूबाजूच्या परिसरातील पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी आरोपी सागर आणि त्याच्या पाच साथीदारांना ताब्यात घेतले. सतीश पाल तसेच त्याचे साथीदार पसार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Goons throw stones at police: Tensions in Kapilnagar, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.