उपराजधानीच्या जावयाचे उत्तुंग यश
By Admin | Updated: May 29, 2014 03:21 IST2014-05-29T03:21:46+5:302014-05-29T03:21:46+5:30
सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील मुकुल रोहटगी यांची देशाच्या

उपराजधानीच्या जावयाचे उत्तुंग यश
नागपूूर : सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील मुकुल रोहटगी यांची देशाच्या ‘अँटॉर्नी जनरल’पदी नियुक्ती झाल्याने उपराजधानीची मानदेखील उंचावल्या गेली आहे. देशातील अनेक गाजलेल्या खटल्यांना यशस्वीपणे लढविणारे रोहतगी यांचे नागपूरशी विशेष ‘कनेक्शन’ आहे. ते नागपूरचे जावई असून येथील मातीशी त्यांचे ऋणानुबंध राहिले आहेत. उपराजधानीतील नामवंत वकील दिवंगत अँड.जी.एल.सांघी यांच्या ज्येष्ठ कन्या वसुधा या मुकुल रोहटगी यांच्या पत्नी आहेत. अँड.रोहटगी यांनी करिअरमधली सुरुवातीच्या वर्षात सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश वाय.के.सबरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले होते. यादरम्यान त्यांनी अनेक खटल्यांत आपल्या कौशल्याने यश मिळविले. माजी सरन्यायाधीश सबरवाल व दिवंगत अँड.जी.एल.सांघी यांचे घनिष्ठ संबंध होते. या दोघांचेही मुकुल रोहतगी यांना वेळोवेळी मार्गदर्शन व सल्ले मिळत गेले. साधी राहणी, उच्च विचार देशाचे