उपराजधानीतील गे जोडप्यांनी केले ‘शुभमंगल ज्यादा सावधान’चे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:23 PM2020-02-27T12:23:49+5:302020-02-27T12:26:37+5:30

३७७ हे कलम हटल्यानंतर समाजात समलैंगिक नागरिकांविषयी कुतुहलासोबतच जी जागृती आली आहे ती ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने अधिक विस्तारेल असा विश्वास नागपुरातील एका गे जोडप्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

Gay couples from the sub-capital welcome the 'Shubhmangal jyada savdhan' | उपराजधानीतील गे जोडप्यांनी केले ‘शुभमंगल ज्यादा सावधान’चे स्वागत

उपराजधानीतील गे जोडप्यांनी केले ‘शुभमंगल ज्यादा सावधान’चे स्वागत

Next
ठळक मुद्देवस्तुस्थिती आणि चित्रपटात बरीच तफावत असल्याचेही मत

वर्षा बाशू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: ३७७ हे कलम हटल्यानंतर समाजात समलैंगिक नागरिकांविषयी कुतुहलासोबतच जी जागृती आली आहे ती ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने अधिक विस्तारेल असा विश्वास नागपुरातील एका गे जोडप्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
निखिल व रवी (नावे बदलली आहेत) हे नागपुरातील एक गे जोडपे. गेल्या सहा वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांनी गे व्यक्तींच्या जीवनावर आधारित हा चित्रपट पाहिला असून त्यांनी त्याविषयी समाधान व्यक्त केला आहे. शहरातील गे तरुणांनी हा चित्रपट मोठ्या उत्साहात पाहिला व आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
गे व्यक्तींना त्यांचे कुटुंबच सर्वात प्रथम स्वीकारत नाही ही वस्तुस्थिती या चित्रपटाने समाजासमोर नीट आणली आहे. त्यांचे सख्खे नातेवाईक व कुटुंबियच त्यांना नाकारतात तर मग समाज फार दूरच राहिला. या दोघांपैकी निखिलला अद्यापी त्याच्या कुटुंबाने स्वीकारलेले नाही. तो नोकरी करतो व एकटाच राहतो.
चित्रपटात दाखवल्याप्रमाणे गे व्यक्तींमध्ये खूप घट्ट नाते असते. ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. ते अतिशय भावनाप्रधान असतात. बाहेरच्या जगातली समस्या ते एकवेळ सोडवू शकतात पण नात्यातला तणाव त्यांना सहन होत नसतो. या चित्रपटात दाखल्याप्रमाणे आपण गे आहोत याचा स्वीकार करणेही गे व्यक्तीला खूप जड जात असते. तसा स्वीकार स्वत:सोबत व जगासोबत करणे यासाठी फार हिंमत लागते. कुणाचा तरी आधार लागतो.
हा चित्रपट करमणुकीच्या दृष्टीने थोडा विनोदी बनवला आहे. त्याने बॉक्स आॅफिसवर यशही मिळवले आहे. तो विनोदी बनवल्याने त्याला पाहण्यासाठी जास्तीतजास्त लोक येतील असे वाटते. हा चित्रपट जर गंभीर स्वरुपाचा असता तर तो कुणीच पाहिला नसता असे निखिलचे मत पडले.
आपल्या बाजूला बसलेली व्यक्ती ही गे, लेस्बियन वा तृतीयपंथी आहे हे कळल्यावर जो धक्का बसतो तो बसणे जेव्हा थांबेल तेव्हाच खऱ्या अर्थाने लिंगसमानता आली असे म्हणता येईल.
नागपुरात समलैंगिक व्यक्तींसाठी काम करणाºया सारथी ट्रस्टचे प्रमुख आनंद चंद्राणी व निकुंज जोशी या दोघांनीही अशा प्रकारच्या चित्रपटांमुळे समाजाची समलैंगिक व्यक्तींकडे पाहण्याची पूर्वग्रहदूषित नजर बदलेल असा विश्वास व्यक्त केला.

Web Title: Gay couples from the sub-capital welcome the 'Shubhmangal jyada savdhan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.