नागपूर शहरात कचऱ्याचे ढिगारे; यंत्रणा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 11:40 PM2019-10-28T23:40:06+5:302019-10-28T23:41:44+5:30

नागपूर शहरातील कचरा संकलनाची यंत्रणा कोलमडली  आहे. गेल्या आठवडाभरात अनेक वस्त्यात सफाई कर्मचारी नसल्याने कचऱ्याचे ढिगारे लागले आहेत.

Garbage piles in Nagpur city; The system collapsed | नागपूर शहरात कचऱ्याचे ढिगारे; यंत्रणा कोलमडली

नागपूर शहरात कचऱ्याचे ढिगारे; यंत्रणा कोलमडली

googlenewsNext
ठळक मुद्देस्वच्छतेचा दर्जा कसा सुधारणार : अनेक वस्त्यांत तीन-चार दिवसात सफाई कर्मचारी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छ व सुंदर शहरात देशभरातील अनेक शहरांनी नागपूरपासून धडा घेत स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल स्थानी आले आहेत. यात इंदूर शहराचे उदाहरण देता येईल. नागपूर महापालिकेच्या घराघरातून कचरा संकलन करण्याच्या धर्तीवर इंदूर शहराने यंत्रणा राबवून स्वच्छतेच्या बाबतीत देशभरात पहिला क्रमांक मिळवला. दुसरीकडे देशभरातील टॉप २० शहरात समावेश व्हावा, यासाठी धडपड सुरू असलेल्या नागपूर शहरातील कचरा संकलनाची यंत्रणा कोलमडली  आहे. गेल्या आठवडाभरात अनेक वस्त्यात सफाई कर्मचारी नसल्याने कचऱ्याचे ढिगारे लागले आहेत.
दिवाळीचा सण शहरात सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. लक्ष्मीपूजनाला शहरात सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रस्त्यांवर फोडलेल्या फटाक्यांचा कचरा दुसऱ्या दिवशी सोमवारी अनेक वस्त्यात तसाच पडून होता. बाजार भागातही साफसफाई नव्हती. महाल येथील राजविलास टॉकीजच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला कचऱ्याचा ढीग साचला आहे. सायकल स्टँडच्या बाजूच्या गल्लीतही अशीच परिस्थिती आहे. सीताबर्डी उड्डाणपुलाखाली लोकमत चौकाच्या बाजूला कचरा साचून आहे. इतरवारी, सदर व सीताबर्डी यासारख्या बाजार भागात रस्त्यांच्या कडेला जागोजागी कचऱ्याचे ढिगारे लागले आहेत.
निवासी भागात अनेक वस्त्यात साफसफाई करणारे कर्मचारी गेल्या दोन-तीन दिवसात फिरकले नाही. प्रमुख रस्त्यांचीही साफसफाई झाली नाही. जागोजागी फटाक्यांचा कचरा तसाच पडून आहे. काही वस्त्यात कचरा संकलन करणारी गाडी फिरली तर काही वस्त्यात फिरली नाही. यामुळे लोकांनी उघड्यावर कचरा टाकला. कचरा संकलन केंद्रावरील कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
नागपूर शहरात दररोज ११०० ते १२०० मेट्रिक टन कचरा निघतो. हा कचरा संकलित करून भांडेवाडी येथे त्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. परंतु भांडेवाडी येथे प्रक्रिया होत नाही. प्रक्रि येच्या नावाखाली भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे बायोमायनिंग, कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु अद्याप प्रकल्प पूर्णक्षमतेने सुरू झालेले नाही.

Web Title: Garbage piles in Nagpur city; The system collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.