नागपुरात  घराघरातून संकलित होणार कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 11:53 PM2019-11-08T23:53:10+5:302019-11-09T00:42:23+5:30

स्वच्छतेच्याबाबतीत नागपूर शहराला पहिल्या दहा शहरांमध्ये पोहोचवण्यासाठी मनपा प्रशासनाने कंबर कसली आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून शहरात कचरा संकलनाची नवी व्यवस्था अमलात येणार आहे.

Garbage collected from house to house in Nagpur | नागपुरात  घराघरातून संकलित होणार कचरा

नागपुरात  घराघरातून संकलित होणार कचरा

Next
ठळक मुद्दे१५ तारखेपासून कचरा उचलण्याची नवी व्यवस्थानागरिकांना सुका व ओला असा वेगवेगळा कचरा गोळा करून ठेवावा लागेलहॉटेल, बाजारमध्ये रात्री उचलला जाणार कचरानागरिकांसाठी सुरु होणार हेल्पलाईन नंबर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छतेच्याबाबतीत नागपूर शहराला पहिल्या दहा शहरांमध्ये पोहोचवण्यासाठी मनपा प्रशासनाने कंबर कसली आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून शहरात कचरा संकलनाची नवी व्यवस्था अमलात येणार आहे. याअंतर्गत व्यावसायिक परिसर, हॉटेल, बाजार आदी परिसरातील कचरा सेकंड शिफ्ट म्हणजे रात्रीच्या वेळी उचलला जाईल तर डोअर टू डोअर कचरा उचलण्याची प्रक्रिया १०० टक्के अमलात आणण्यात प्रयत्न केला जाणार आहे. या नव्या व्यवस्थेत सुका आणि ओला कचरा वेगवेगळा गोळा करून नागरिकांना ठेवणे आवश्यक आहे, असे न केल्यास त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई सुद्धा होऊ शकते. दुसरीकडे कंपनीच्या लोकांनी कचरा उचलला नाही तर त्यांच्यावरही दंड बसेल. यादृष्टीने नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर दिले जातील. त्यावर तक्रारी करता येईल.
शुक्रवारी पत्रकारांशी चर्चा करतांना मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. बांगर यांनी सांगितले की, कचऱ्याचे वर्गीकरण होणे आवश्यक आहे. तेव्हाच कचरा संकलनाची व्यवस्था प्रभावीपणे अमलात येऊ शकेल. यासाठी शहरातील नागरिकांचेही सहकार्य अत्यावश्यक आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून शहरात कचरा संकलनाची नवीन व्यवस्था अमलात येणार आहे. कचरा उचलण्याच्या सध्याच्या पद्धतीत अनेक बदल करण्यात आले आहे. हाथ ठेला, सायकलरिक्षा या मानवी श्रमाच्या वाहनाऐवजी मॅकनाईज्ड सिस्टीम अर्थात स्वचलित वाहने व उपकरणांचा जास्तीत जास्त उपयोग करण्यात येणार आहे. कचरा डम्प करण्याऐवजी वाहन ते वाहन थेट डम्पिंग यार्डपर्यंत घेऊन जाणे, अशी ही व्यवस्था असून यासाठी शहरातील दहा झोनमध्ये दहा कचर ट्रान्सफर स्टेशन बनवण्यात येतील. पाच कचरा ट्रान्सफर स्टेशनसाठी निविदाही काढण्यात आलेल्या आहेत.
बांगर यांच्यानुसार १०० टक्के घरातून कचरा उचलला जावा, यावर सर्वप्रथम भर दिला जाईल. यासाठी एनजीओ, व्यापारी संघटना, शैक्षणिक संघटना, नागरी संघटना आदी विविध संघटनांची मदत घेण्यात येईल. अधिकऱ्यांनाही जनजागृतीच्या कामावर लावण्यात आले आहे. जेणेकरून लोकांना सुका आणि ओला कचरा संकलित करण्याची पद्धतीची माहिती व्हावी. शहराला ‘झिरो गारबेज सिटी’ बनवण्याचे लक्ष्य आहे. झोन स्तरावर अधिकऱ्यांच्या जबाबदाऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत. १५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान प्रभागांमध्ये आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक व कार्यक्रम घेऊन लोकांना कचरा संकलनाच्या नवीन व्यवस्थेबाबत माहिती दिली जाईल. कचरा संकलनाची व्यवस्था सुरळीत सुरु झाल्यावर सीएनजी, कंपोस्टिंग, एमआरएफ सेंटर आदींवर लक्ष दिले जाईल. 

 ‘कनक ’च्या कर्मचाऱ्यांचे होणार समायोजन - वीरेंद्र कुकरेजा 
 मनपा आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी सागितले की, कनक रिसोर्सेसच्या कर्मचाऱ्यांना नव्या कंपनीच सामावून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जे कर्मचारी फिजिकल फिटनेस आणि पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये योग्य ठरेल त्याला नव्या कंपनीत ठेवणे बंधनकारक राहील. नवीन व्यवस्थेत वाहनांची संख्या तीन पट करण्यात आली आहे. ट्रान्सफर स्टेशनसाठी निविदा काढण्यात आल्या आहे. ११ नोव्हेंबरपासून नवीन व्यवस्थेची ट्रायल सुरु होईल. 

 कचरा संकलनाची व्यवस्था मजबूत करणे हीच प्राथमिकता :  आयुक्त अभिजित बांगर 
मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले की, कचरा संकलनासाठी राज्य सरकारने शुल्क घेण्याची व्यवस्था अमलात आणली आहे. युजर चार्जची व्यवस्था लागू झालेली आहे. परंतु सध्या शुल्क आवश्यक करण्यात आलेले नाही. तरीही सरकारच्या दिशा-निर्देशांच्या आधारावर नागरिकांना शुल्क द्यावे लागेल. परंतु सध्या शहरातील कचरा संकलनाची व्यवस्था मजबुत करणे यालाच आमची प्राथमिकता आहे. 
 
 अशी आहे नवी व्यवस्था 

  •  हात गाडी, सायकल रिक्षाने कचरा गोळा करण्याऐवजी आता वाहनांमधून कचरा उचलला जाईल. मॅकनाईज्ड सिस्टमवर भर दिला जाणार
  •  कचरा संकलनाचे जे मार्ग निश्चित झाले आहेत, त्यावर अंमल सुरु होणार
  •  सहायक आयुक्त, झोन अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.
  •  प्रत्येक झोन व प्रभागासाठी स्वतंत्र व्यवस्था 
  •   व्यापारिक परिसरात सेकंड शिफ्टमध्ये कचरा संकलन केले जाईल. आठवडी बाजारासाठी स्वतंत्र व्यवस्था राहील.
  • हॉटेल व भोजनालयातूनही रात्रीला कचरा संकलित केला जाईल. जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी रस्त्यावर कचरा पडलेला दिसू नये
  •  चिकन व मटन मार्केटमधून कचरा संकलनसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था केली जाईल.
  •  रस्त्यावर झाडू मारल्यानंतर तेथे जमा कचऱ्यासाठी कलेक्शन पॉइंट निश्चित केले जातील. कचरा जाळणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई केली जाईल
  •  उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी न्युसेंस डिटेक्शन स्क्वॉड (एनडीएस)ची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ८७ स्वच्छता दूत असून ते वाढवून २०० करण्यात येतील. 

Web Title: Garbage collected from house to house in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.