ओव्हरटेकिंगची मस्ती, जीवाशी कुस्ती; एकूण रस्ते अपघातांच्या संख्येत मात्र घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 09:06 AM2020-09-26T09:06:58+5:302020-09-26T09:07:50+5:30

२०१९ साली झालेल्या अपघातांपैकी बहुतांश अपघात हे ओव्हरटेकिंगमुळेच झाले असल्याची बाब एनसीआरबीच्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) समोर आली आहे.

The fun of overtaking, wrestling with the soul; However, the total number of road accidents decreased | ओव्हरटेकिंगची मस्ती, जीवाशी कुस्ती; एकूण रस्ते अपघातांच्या संख्येत मात्र घट

ओव्हरटेकिंगची मस्ती, जीवाशी कुस्ती; एकूण रस्ते अपघातांच्या संख्येत मात्र घट

Next
ठळक मुद्देअतिघाईमुळे सर्वाधिक बळी 

योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्ते किंवा महामार्गावर वाहने चालवत असताना समोरच्याच्या पुढे जाण्यासाठी अनेकजण नियमांचा भंग करताना दिसून येतात. मात्र हीच अतिघाई बरेचदा जीवावर बेतते. वाहनावरील ताबा सुटतो व निष्पापांच्या जीवावर आघात होतो.

२०१९ साली नागपुरात १ हजार ११९ रस्ते अपघात झाले. त्यात एकूण २७० नागरिकांचा बळी गेला व ८९९ लोक जखमी झाले. हे सर्व अपघात एकतर ओव्हरटेकिंग, अतिवेग किंवा दारुच्या नशेत वाहने चालविल्यामुळे झाले. यातील तब्बल ६४ टक्के अपघात हे ओव्हरटेकिंगच्या नादात झाले. तर या कारणामुळे १५९ लोकांना जीव गमवावा लागला. त्या खालोखाल अतिवेगामुळे ३८६ अपघात झाले व त्यात ११० लोकांचा मृत्यू झाला.

दरम्यान, २०१५ ते २०१९ च्या आकडेवारीकडे नजर टाकली असता नागपुरातील रस्ते अपघातांमध्ये घट होत असल्याचे चित्र दिसून आले. २०१५ मध्ये शहरात १ हजार ३९७ अपघातांची नोंद झाली होती व त्यात ३१७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. २०१६ मध्ये हाच आकडा १ हजार ५७४ अपघात व ३९६ मृत्यूंवर गेला होता. त्यानंतर सातत्याने अपघातांची संख्या व मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा कमी होत आहे.

दुचाकीस्वारांना बसतोय फटका
अतिवेग किंवा ओव्हरटेकिंगच्या नादात होणाऱ्या अपघातांमध्ये सर्वाधिक बळी हे दुचाकीस्वारांचेच जात असल्याचे दिसून आले. २०१९ मध्ये रस्ते अपघातात १२२ दुचाकीस्वारांचा जीव गेला. त्याखालोखाल ट्रक-ट्रॉलीतील ८१ व कारमध्ये २३ जणांचा मृत्यू झाला. विविध अपघातात १० पादचाऱ्यांचा हकनाक बळी गेला.

मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी

वाहन प्रकार        मृत्यू
ट्रक-ट्रॉली            ८१
बस                     १५
कार                    २३
जीप                        ७
आॅटोरिक्षा             ९
दुचाकी              १२२
सायकल              २
पादचारी                  १०
एकूण                २७०

 

 

Web Title: The fun of overtaking, wrestling with the soul; However, the total number of road accidents decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात