१.१५ लाख रुपयांची अफरातफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:09 AM2021-04-10T04:09:21+5:302021-04-10T04:09:21+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : पाेस्टाच्या खातेदारांकडून रक्कम घेऊन त्या रकमेचा त्यांच्या खात्यात वेळीच भरणा न करता अफरातफर केल्याचा ...

Fraud of Rs 1.15 lakh | १.१५ लाख रुपयांची अफरातफर

१.१५ लाख रुपयांची अफरातफर

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : पाेस्टाच्या खातेदारांकडून रक्कम घेऊन त्या रकमेचा त्यांच्या खात्यात वेळीच भरणा न करता अफरातफर केल्याचा प्रकार काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सयाेनाेली येथे नुकताच घडला. यात १ लाख १५ हजार ५०० रुपयांची अफरातफर करण्यात आली.

सुशील ज्ञानेश्वर गायकवाड (रा. साेनाेली, ता. काटाेल) असे आराेपीचे नाव आहे. साेनाेली येथील काही नागरिकांचे पाेस्ट ऑफिसमध्ये खाते असून, ते त्यांच्या खात्यात नियमित रकमेचा भरणा करायचे. सुशील त्या खातेदारांकडून ती रक्कम स्वीकारायचा. मध्यंतरी सुशीलने खातेदारांकडून रक्कम स्वीकारली, मात्र त्या रकमेचा पाेस्ट ऑफिसमध्ये भरणाच केला नाही. हा प्रकार लक्षात येताच खातेदारांनी डाक विभागाचे डाक निरीक्षक शिवम आनंदकुमार शंकर (२८, रा. सक्करदरा, नागपूर) यांच्याकडे तक्रार केली.

त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चाैकशी केली असता, यात सुशीलने खातेदारांकडून ९ डिसेंबर २०१८ ते २४ एप्रिल २०१९ या काळात १ लाख १५ हजार २०० रुपये स्वीकारले असून, त्याने ती रक्कम संबंधित खातेदारांच्या खात्यात जमा केली नसल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी गुरुवारी (दि. ८) काटाेल पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली.

याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी भा.दं.वि. ४२०, ४०९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक अश्विनी वानखेडे करीत आहेत. वृत्त लिहीपर्यंत आराेपीस अटक करण्यात आली नव्हती किंवा त्याला चाैकशीसाठीही ताब्यात घेण्यात आले नव्हते. त्याचा शाेध सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Web Title: Fraud of Rs 1.15 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.