राज्यातील वन पर्यटनाला अखेर मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:08 AM2021-06-25T04:08:26+5:302021-06-25T04:08:26+5:30

नागपूर : राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यातील क्षेत्रात वन पर्यटन सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. कोरोना संक्रमणामुळे राष्ट्रीय ...

Forest tourism in the state finally approved | राज्यातील वन पर्यटनाला अखेर मंजुरी

राज्यातील वन पर्यटनाला अखेर मंजुरी

Next

नागपूर : राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यातील क्षेत्रात वन पर्यटन सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. कोरोना संक्रमणामुळे राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने (एनटीसीए) देशभरातील व्याघ्र प्रकल्प व अभयारण्य क्षेत्रांमधील पर्यटन बंद करण्याचे आदेश यापूर्वी दिले होते.

महाराष्ट्रामधील कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत असल्याने वन विभागाने एनटीसीएला पत्र लिहून वन पर्यटन सुरू करण्याची परवानगी मागितली होती. यावर, नियमांचे पालन करून हे पर्यटन सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे.

राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी या आधारावर राज्यभरातील सर्व व्याघ्र प्रकल्प संचालकांना पत्र लिहून कळविले आहे. यानुसार ३० जून पर्यंत कोअर क्षेत्रात वन पर्यटनाला परवानगी राहणार आहे. १ जुलैनंतर पावसाळ्यामुळे राज्यात वन पर्यटन बंद होत असते. या नंतरही व्याघ्र प्रकल्पात स्थिती चांगली राहिल्यास बफर क्षेत्रातील पर्यटन पुढील परिस्थिती लक्षात घेऊन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र यासाठी पर्यटकांचे थर्मल स्क्रीनिंग करणे आणि सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.

Web Title: Forest tourism in the state finally approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.