नागपुरात पतंगाने घेतला पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 12:41 AM2020-01-21T00:41:01+5:302020-01-21T00:42:04+5:30

इमारतीच्या छतावर पतंग उडवीत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला. मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे सोमवारी पुढे आले.

The first victim of a kite taken in Nagpur | नागपुरात पतंगाने घेतला पहिला बळी

नागपुरात पतंगाने घेतला पहिला बळी

Next
ठळक मुद्देट्रॉमा केअर सेंटरमध्ये तरुणाचा मृत्यू : मांजाने गळा कापल्याने तरुणी अत्यवस्थ

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : इमारतीच्या छतावर पतंग उडवीत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला. मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे सोमवारी पुढे आले. पतंगाच्या नादात हा पहिला बळी असल्याचे बोलले जात आहे. तर दुसऱ्या प्रकरणात रविवारी वाडी परिसरात मांजामुळे एका तरुणीचा गळा कापल्याने अत्यवस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले.
मृताचे नाव सादिक गुलाम नबी शेख (३५) रा. नागपूर असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, १५ जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी सादिक हा इमारतीच्या छतावर पतंग उडवत होता. अचानक त्याचा तोल जाऊन खाली पडला. मणक्याचे हाड फ्रॅक्चर झाले. शरीराच्या इतरही भागावर गंभीर इजा झाल्या होत्या. त्याच अवस्थेत सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान त्याला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दुसऱ्या घटनेत, सहयोगीनगर नारी रोड येथील रहिवासी श्रद्धा शेंडे (२४) ही परीक्षा देऊन वाडी परिसरातून घरी जात होती. वाटेत तिच्या गळ्यात पतंगचा मांजा अडकला. गळा कापल्याने रक्तस्राव सुरू झाला. अचानक घडलेल्या घटनेने श्रद्धा बेशुद्ध झाली. परिसरातील लोकांनी तातडीने तिला जवळच्या खासगी इस्पितळात दाखल केले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, पतंगाच्या हुल्लडबाजीत ‘सुरे’ ठरू पाहणाऱ्या मांजाच्या विक्रीवर व वापरण्यावर बंदी आहे. परंतु त्यानंतरही मोठ्या प्रमाणात या मांजाचा वापर झाल्याने दुचाकी वाहन चालकांसोबत पायी चालणारे जखमी झाले. काहींवर इस्पितळात उपचार घेण्याची वेळ आली. सध्या मकर संक्रात संपली असली तरी पतंगची हुल्लडबाजी अजूनही सुरू आहे. मांजाचे कधी थांबणार बळी, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

Web Title: The first victim of a kite taken in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.