शेतातील मजुराला डांबून पीक पेटवले; सात आरोपींना अटक  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 07:01 PM2019-11-22T19:01:27+5:302019-11-22T19:01:43+5:30

शेतात एकटा असलेल्या मजुराला खोलीत डांबून शेतातील संपूर्ण सोयाबीनचे पीक पेटवले त्यानंतर शेतजमिनीवर जेसीबी फिरवून उर्वरित पीक नेस्तनाबूत करणाऱ्या सात आरोपींना आज हिंगणा पोलिसांनी अटक केली.

The field laborers were burned and the crop burned; Seven accused arrested | शेतातील मजुराला डांबून पीक पेटवले; सात आरोपींना अटक  

शेतातील मजुराला डांबून पीक पेटवले; सात आरोपींना अटक  

Next

हिंगणा: शेतात एकटा असलेल्या मजुराला खोलीत डांबून शेतातील संपूर्ण सोयाबीनचे पीक पेटवले त्यानंतर शेतजमिनीवर जेसीबी फिरवून उर्वरित पीक नेस्तनाबूत करणाऱ्या सात आरोपींना आज हिंगणा पोलिसांनीअटक केली. सदर घटना गुरुवारी (ता २१ )सायंकाळी ७ च्या सुमारास घडली.                 

अक्रम खान-अकबर खान (वय २४) रा मोठा ताजबाग परिसर नागपूर, कुणाल प्रदीप पांडे (२४)प्रेमनगर,नागपूर, रिषभ ललित श्रीवास्तव( २४),जुनी पारडी ,नागपूर ,शमशान शज्जाद शेख( ३३),भांडेवाडी,नागपूर, हेमंत नारायण अवधूत (४०),शांती नगर, नागपूर, आशिष प्रकाश मडावी (२५),सिरसपेठ नागपूर, अमरसिंग मनोजसिंग तोमर (वय २९) खरे टाऊन, धरमपेठ नागपूर अशी आरोपींची नावे असून  हे सातही जण गुरुवारी सायंकाळी सुमठाणा शिवारातील नरेंद्र गायकवाड यांच्या शेतात मोटरसायकल व जेसीबी घेऊन पोहचले .त्यावेळी तिथे वास्तव्यास असलेल्या शेतमजूर शंकर रामभाऊ बर्डे हा एकटाच होता .सुरवातीला शंकर ला त्यांनी काठ्या व लथाबुक्क्यांनी मारहाण केली .त्यानंतर त्याला शेतातील घरात कोंडले व शेतात कापणी झाल्यानंतर ठेवलेल्या सोयाबीन च्या पिका (गंजी)ला आग लावली .

Web Title: The field laborers were burned and the crop burned; Seven accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.