रामटेक येथील यात्रा रद्द : जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारली झाकीची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:27 AM2020-11-27T00:27:55+5:302020-11-27T00:29:38+5:30

Festivel at Ramtek canceled, nagpur news कोरोना प्रतिबंधात्मक उपायांतर्गत रामटेक येथील यात्रा महोत्सवाला स्थगिती देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

Festivel at Ramtek canceled: District Collector denies Zaki permission | रामटेक येथील यात्रा रद्द : जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारली झाकीची परवानगी

रामटेक येथील यात्रा रद्द : जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारली झाकीची परवानगी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना प्रतिबंधात्मक उपायांतर्गत रामटेक येथील यात्रा महोत्सवाला स्थगिती देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

रामटेक येथील भारतीय जनसेवा मंडळ यांनी रामटेक शहरात वैकुंठ चतुर्दशी निमित्त २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या प्रतिकात्मक ५ झाकीकरिता परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व दुसऱ्या टप्प्यातील कोरोना विषाणूच्या प्रसारात झपाट्याने वाढ होत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ व त्याखालील नियमावली मधील नियम २ व १० नुसार श्रीराम गडमंदिर रामटेक येथे होणाऱ्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूरचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे यांनी एका आदेशाद्वारे शोभायात्रेला परवानगी नाकारली आहे.

रामटेक शहरात वैकुंठ चतुर्दशी निमित्त १९८० पासून सामाजिक बंधुत्व व राष्ट्र निर्माण, सद्भा‌व निर्माण करण्याच्या दृष्टीने फक्त मनोरंजन सांस्कृतिक झाकीचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी शोभायात्रेत ४० झाकी सहभागी होत असतात. त्यामुळे या वर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे शासकीय नियमांचे पालन करुन सार्वजनिक आरोग्याची काळजी घेत मागील ३९ वर्षापासून सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक तसेच सर्व जाती धर्मामध्ये बंधुत्व व राष्ट्रप्रेम जागृत करण्याच्या उपक्रमास खंड पडु नये याकरीता २८ नोव्हेंबरला प्रतिकात्मक पाच झाकीकरीता परवानगी मिळावी, यासाठी निवेदन देण्यात आले होते. वैकुंठ चतुर्दशी निमित्ताने रामटेक येथे ४० ते ५० हजाराच्या संख्येने भाविकांची गर्दी होते. रामटेक शहरात सुध्दा मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून शासनातर्फे वेळोवेळी तीव्र व सौम्य प्रकारची जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

तसेच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सुध्दा तसे आदेश निर्गमित केले आहे.

Web Title: Festivel at Ramtek canceled: District Collector denies Zaki permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.