उमदा विद्यार्थी नेता, निष्णात विधीज्ञ व संघर्षशील नेतृत्त्व हरपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 01:58 PM2019-08-24T13:58:53+5:302019-08-24T13:59:26+5:30

देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाविषयी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Excellent student leaders, skilled scholars and struggling leadership lost | उमदा विद्यार्थी नेता, निष्णात विधीज्ञ व संघर्षशील नेतृत्त्व हरपले

उमदा विद्यार्थी नेता, निष्णात विधीज्ञ व संघर्षशील नेतृत्त्व हरपले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाविषयी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. आमचे थोर नेते अरुण जेटली यांच्या निधनाची बातमी ऐकून वाईट वाटले. मी अतिशय व्यथित आहे. काल-परवाच सुषमाजी आमच्यातून निघून गेल्या. अरुण जेटली यांचे कुटुंबिय, आप्तगण व कोट्यवधी भाजपा कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे.
एक उमदा विद्यार्थी नेता, आणिबाणीविरूद्ध कठोर संघर्ष करणारा नेता, मानवी हक्कांचा खंदा समर्थक, एक उत्तम आणि निष्णात विधिज्ञ आणि संघर्षशील नेतृत्त्व आपल्यातून कायमचे हिरावून घेतले गेले आहे. प्रकृती प्रतिकूल असतानाही पडद्याआड आपल्या क्षमतांचा पूर्ण विनियोग करीत 2019च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांना जवळजवळ प्रत्येक दिवशी ब्लॉगच्या माध्यमातून लेखन करीत प्रचारात स्वत:ला झोकून दिलेले पाहिले आहे. अलिकडच्या काळात भाजपाच्या प्रत्येक बैठकांमध्ये त्यांना उपस्थित राहताना पाहिले आहे. त्यांचा समर्पण भावच त्यातून दिसून येतो. देशाचे अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, माहिती आणि प्रसारणमंत्री, विधी व न्याय विभागाचे मंत्री, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी देशाची केलेली सेवा कायम स्मरणात राहील. जीएसटीच्या अंमलबजावणीत सुद्धा त्यांनी दिलेले योगदान कायम अधोरेखित होत राहील.

Web Title: Excellent student leaders, skilled scholars and struggling leadership lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.