Maharashtra Election 2019; मतदारांमध्ये उत्साह; १२ वाजेपर्यंत विदर्भात सरासरी २० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:05 PM2019-10-21T12:05:51+5:302019-10-21T14:20:09+5:30

महाराष्ट्र विधानसभेच्या १३ व्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात आज सोमवार २१ आॅक्टोबर रोजी मतदारांमध्ये उत्साह जाणवत होता.

Enthusiasm among voters; Until 12 o'clock in Vidarbha, on average 20 per cent voting | Maharashtra Election 2019; मतदारांमध्ये उत्साह; १२ वाजेपर्यंत विदर्भात सरासरी २० टक्के मतदान

Maharashtra Election 2019; मतदारांमध्ये उत्साह; १२ वाजेपर्यंत विदर्भात सरासरी २० टक्के मतदान

Next
ठळक मुद्देगोंदिया, अमरावतीत मतदानाची टक्केवारी अधिकदिव्यांग, वृद्ध व्यक्तींनी लावली हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महाराष्ट्र विधानसभेच्या १३ व्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात आज सोमवार २१ आॅक्टोबर रोजी मतदारांमध्ये उत्साह जाणवत होता. सकाळच्या वेळेस मतदारांनी रांगा लावणे सुरू केले होते. सकाळची गर्दी ओसरल्यानंतर दिव्यांग व वृद्ध मतदारांनी मतदान केंद्राकडे मोर्चा वळवल्याचे दिसून आले. १२ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार विदर्भात सरासरी २० टक्के मतदान झाल्याचे दिसले.
अमरावती जिल्ह्यात १५.२१ टक्के मतदान झाले. यात अमरावती शहर १५.२२ टक्के, धामणगाव रेल्वे १२, बडनेरा १८, तिवसा १२, दर्यापूर ११.२५, मेळघाट २९.३२, अचलपूर १६.३, मोर्शी ८ टक्के असे मतदान झाले होते. गोंदिया जिल्ह्यात १८ टक्के मतदानाची नोंद आहे. यात अर्जुनी मोरगाव ३२, तिरोडा १७, आमगाव ३० टक्के असे मतदान झाले. चंद्रपूर जिल्ह्यात या तुलनेत कमी म्हणजे ६.३७ टक्के एवढीच नोंद झाली. नागपूरमध्ये १७ टक्के मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात १४.५ टक्के मतदान झाले.
 

 

 

 

Web Title: Enthusiasm among voters; Until 12 o'clock in Vidarbha, on average 20 per cent voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.